चिखलीकर यांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:08 IST2021-02-05T06:08:14+5:302021-02-05T06:08:14+5:30

नुकसानभरपाईसाठी उपोषण इस्लापूर - नंदगाव तांडा व रिठ्ठा, जलधारा, शिवारातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी उपोषण ...

Welcome to Chikhlikar | चिखलीकर यांचे स्वागत

चिखलीकर यांचे स्वागत

नुकसानभरपाईसाठी उपोषण

इस्लापूर - नंदगाव तांडा व रिठ्ठा, जलधारा, शिवारातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले. नांदेड-किनवट राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे रस्त्यालगतच असलेल्या शेतीचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे नुकसानीची मागणी शेतकरी करीत आहेत.

बँक अधिकाऱ्यांची भेट

मुदखेड - तालुक्यातील वाडी तांड्यातील बचत गटांना बँक ऑफ बडोदाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. या भेटीत त्यांनी पात्र असलेल्या बचत गटांना अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय घेतला. चिकाळा तांडा येथील बैठकीत सरपंच सविता जाधव यांनी शाखा व्यवस्थापक महेंद्र रामटेके, अनिल खडबरात यांचे स्वागत केले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.

भाविकांना फराळ

माहूर - सांगवी बु. येथील हनुमान मंदिराजवळील दत्त संस्थानचे गणपत गिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली सांगवी बु. ते माहूर अशी पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेतील भाविकांना आनंदराव शिंदे यांच्यावतीने फराळ देण्यात आला. यावेळी रमेश पाटील, माधव पाटील, चक्रधर कोकाटे, चंद्रकांत पवार उपस्थित होते.

Web Title: Welcome to Chikhlikar