शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

दिव्यांनी उजळले नदीपात्र; परिवाराच्या दीर्घायुष्यासाठी महिलांनी केली गंगेची आरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 1:51 PM

गोदावरीच्या नगीना घाटावर हजारो महिलांनी एकत्रित येवून गंगेची आरती केली़

ठळक मुद्देनयनमनोहर दृश्य पाहण्यासाठी नगीना घाट परिसराला जत्रेचे स्वरूपआरती करून हजारो महिलांनी नदीपात्रात हजारो दिवे सोडले़

नांदेड : परिवारातील सदस्यांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी पुरातन काळापासून गंगेची आरती केली जाते़ यानिमित्ताने मंगळवारी कार्तिकी पौर्णिमेला नांदेड येथील गोदावरीच्या नगीना घाटावर हजारो महिलांनी एकत्रित येवून गंगेची आरती केली़ तसेच नदीपात्रात हजारो दिवे सोडले़ हे नयन मनोहर दृश्य पाहण्यासाठी नांदेडकरांनी मोठी गर्दी केली होती़ 

अ‍ॅड.दिलीप ठाकूर यांच्या पुढाकाराने सलग पंधराव्या वर्षी या गंगा पूजन व गोदावरीच्या आरतीचे आयोजन करण्यात आले होते़ खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते  पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.  संतोषगुरु परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करण्यात आली. उपस्थित हजारो महिलांना दिवे, द्रोण व फुलांची मोफत व्यवस्था करण्यात आली होती. सालासार भजन मंडळाचे गिरीराज लोया व व त्यांच्या सहका-यांनी पाच आरत्यांचे गायन केले. त्यानंतर महिलांनी आपल्या परिवारातील सदस्यांना दीघार्युष्य लाभावे यासाठी नदीपात्रामध्ये दिवे सोडले हे  नयनमनोहर दृश्य पाहण्यासाठी नगीना घाट परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते.

उत्कृष्ट पूजेची थाळी सजवण्याचा स्पर्धेचे परीक्षण आरती पुरंदरे, प्रणाली देशमुख, प्रा.अंजली सिंगेवार, सुषमा ठाकूर, आशा अग्रवाल यांनी केले़ विजेत्यांना जयश्री ठाकूर, विमल शेट्टी, अमृता जैस्वाल, अनुराधा गिराम, अश्विनी जाधव, शततारका पांढरे, ज्योती कुलकर्णी, गायत्री तपके यांच्या हस्ते  आकर्षक पारितोषिके देण्यात आली. विजेत्यांमध्ये ललिता येमेवार, भावना सोलंकी, सुनीता लिंगापुरे, मंजुषा धारासूरकर, जया जैन, निवेदिता व्यास, पल्लवी जोशी, अनिता गव्हाणकर, सरिता गुंडेवार, पद्मा भराडिया, बरखा कासलीवाल, सविता गुर्रम,फाल्गुनी पारीख, शांभवी शेळके, ज्योती वाघमारे, श्यामा गच्छा यांचा समावेश होता.

संस्कार भारतीच्या रांगोळ्यांनी वेधले लक्ष संस्कार भारती नांदेडच्या सदस्यांनी भव्य रांगोळी काढून उपक्रमाची शोभा वाढविली़ मनपातर्फे सुभाष कुकडे व त्यांच्या जीव रक्षकाबरोबरच पोलीस निरीक्षक संदीप शिवले  यांच्या मार्गदर्शनाखाली वजिराबाद पोलिस ठाण्याच्या वतीने कार्यक्रमस्थळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता़ मारवाडी युवा मंच तर्फे भाविकांना मसाला दूध वाटप करण्यात आले. तर गुरुद्वारा लंगर साहब तर्फे महाप्रसादाचे वाटप  करण्यात आले. 

टॅग्स :Womenमहिलाgodavariगोदावरीriverनदी