युवकाची गळफास लावून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:17 AM2021-03-06T04:17:39+5:302021-03-06T04:17:39+5:30

नागसेन हटकर सेवानिवृत्त लोहा : येथील सहायक पोलीस उपनिरीक्षक नागसेन हटकर सेवानिवृत्त झाल्याने त्यांना एका कार्यक्रमात सपत्नीक निरोप देण्यात ...

Suicide by hanging of a youth | युवकाची गळफास लावून आत्महत्या

युवकाची गळफास लावून आत्महत्या

Next

नागसेन हटकर सेवानिवृत्त

लोहा : येथील सहायक पोलीस उपनिरीक्षक नागसेन हटकर सेवानिवृत्त झाल्याने त्यांना एका कार्यक्रमात सपत्नीक निरोप देण्यात आला. कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक भागवत जायभाये यांच्यासह विविध कार्यकर्ते, कर्मचारी व अन्य उपस्थित होते. पोलीस दलात ३६ वर्षे सेवा केल्यानंतर हटकर निवृत्त झाले आहेत.

अवैध दारू विक्री

नायगाव : तालुक्यातील बरबडा परिसरात अवैध दारू विक्री जोरात सुरू आहे. गावागावांत राजरोसपणे ही दारू सहज उपलब्ध होते. एवढेच नाही तर कहाळा ते कृष्णूर हायवेवर थाटलेल्या खानावळ, हॉटेलमध्येही दारू सहज मिळते. मात्र, या दारूचा पुरवठा होतो कोठून, याचा उलगडा झाला नाही.

पाच दिवसांची कोठडी

लोहा : तालुक्यातील जामगा शिवणी प्रकरणातील आरोपींच्या पोलीस कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्यात आली, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक किशोर कांबळे यांनी दिली. या घटनेत गणेश एडके गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एडके यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

जिल्हा उपाध्यक्षपदी पठाण

हिमायतनगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक जिल्हा उपाध्यक्षपदी सरदारखाँ पठाण यांची निवड झाली. सरदारखाँ हे मागील १५ वर्षांपासून राष्ट्रवादीमध्ये कार्यरत आहेत. युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी पठाण यांची नियुक्ती केली. यावेळी निरीक्षक सूरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष दिलीप धोंडगे, निशांत वाघमारे, सचिन जाधव, तालुकाध्यक्ष सुनील पतंगे आदी उपस्थित होते.

शिक्षण समितीची बैठक

नांदेड : जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची बैठक ४ मार्च रोजी शिक्षण सभापती संजय बेळगे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी त्यांनी दहावी व बारावीच्या परीक्षा व्यवस्थित पार पडण्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचना केली. यावेळी शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, माधव सलगर, उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय मठपती, बंडू अमदूरकर, दिलीप बनसोड, सहायक कार्यक्रम अधिकारी विलास ढवळे आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

मुदखेड : तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर, प्रदेशचे युवक सरचिटणीस वसंत सुगावे पाटील, तालुकाध्यक्ष शिवानंद शिप्परकर आदी उपस्थित होते. यामध्ये अमोल जाधव, आशिष कल्याणे, सोनू जरतारे, महादू क्षीरसागर, खंडू हातागळे, प्रफुल्ल निखाते, प्रवीण हटकर, अनिल कल्याणे, संतोष जाधव, शिवराज जाधव आदींचा समावेश होता.

Web Title: Suicide by hanging of a youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.