शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

Talathi Exam: शेकडो किमीवरून येत गाठले केंद्र; पण ऐनवेळी उडाला गोंधळ, प्रवेश नाकारला

By शिवराज बिचेवार | Updated: August 18, 2023 16:05 IST

विद्यार्थ्यांचा हिरमोड; नांदेड येथील सहयोग कॅम्पसमधील केंद्रातील प्रकार

नांदेड- शुक्रवारी नांदेड शहरातील अनेक केंद्रावर तलाठी भरतीसाठी टीसीएसकडून परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु विष्णूपुरी येथील सहयोग कॅम्पस या परिक्षा केंद्रावर उडालेल्या गोंधळामुळे अनेक भावी तलाठ्यांना परिक्षेपासून वंचित रहावे लागले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून तलाठी भरतीची परिक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा हिरमोड झाला.

गेल्या अनेक वर्षापासून विविध पदाच्या भरतीच्या प्रतिक्षेत विद्यार्थी होते. त्यात शासनाने आता एकदाची भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. त्यात शुक्रवारी तलाठी पदासाठी लेखी परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा तसेच बाहेर जिल्ह्यातून हजारो विद्यार्थी नांदेडात दाखल झाले होते. मात्र शहरातील सहयोग कॅम्पस येथील परिक्षा केंद्रावर गोंधळ उडाला. आधार कार्ड, हॉल तिकीटची रंगीत झेरॉक्स, फोटो यासह इतर कागदपत्रासाठी विद्यार्थ्यांना परत झेरॉक्स सेंटरवर पाठविण्यात आले. तर काहींना किरकोळ कारणावरुन परिक्षा केंद्राबाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. कागदपत्रे तपासणी आणि इतर प्रक्रियांमध्ये वेळ अधिक गेल्याने प्रवेशद्वारापर्यंत पोहचेपर्यंत परिक्षेची वेळ झाली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेरच रोखण्यात आले. या प्रकारामुळे विद्यार्थी संतप्त झाले होते. त्यांनी वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परिक्षा घेण्याची मागणी केली आहे.

बॅगेसाठी २० तर पार्कींगला १० रुपयेसहयोग कॅम्पसमध्ये परिक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना दुचाकी पार्क करण्यासाठी दहा रुपये शुल्क आकारण्यात आले. तर बॅग ठेवण्यासाठी २०रुपये वसूल केले. येथे बॅग ठेवण्यासाठीही मोठी रांग असल्यामुळे विद्यार्थ्यांचा बराचसा वेळ त्यात गेला. अशाप्रकारे विद्यार्थ्यांची या ठिकाणी लूट सुरु असल्याबाबत संताप व्यक्त करण्यात आला.

आणखी किती वर्ष वाट पाहायचीपरिक्षेसाठी एक तासापूर्वीच केंद्रावर आलो होतो. परंतु कलर झेरॉक्स नसल्यामुळे ती काढण्यासाठी परत पाठविण्यात आले. आधार कार्ड सत्यप्रत नसल्यामुळे प्रवेश नाकारण्यात आला. अनेक वर्षानंतर यंदा परिक्षा होत आहे. परंतु त्यापासूनही वंचित राहिलो. आता आणखी किती वर्ष परिक्षेसाठी वाट पाहावी लागणार माहिती नाही. - मनज्योतसिंग मल्ली, परिक्षार्थी

कागदपत्रे तपासणीतच वेळ घातलामाझ्याकडे साधी झेरॉक्स होती. तर कलर काढून आणण्यास सांगितले. तसेच परत फोटोही काढून आणायला लावले. कागदपत्रांची पूर्तता करण्यातच अधिक वेळ गेला. त्यानंतर गेट बंद करण्यात आले. परिक्षेसाठी लोहा येथून पहाटे सहा वाजता निघूनही परिक्षेसाठी वंचित रहावे लागले.- ईश्वर राठोड, परिक्षार्थी.

टॅग्स :examपरीक्षाNandedनांदेडEducationशिक्षण