नांदेडमध्ये पावसाने वेग घेतला; जवळगाव मंडळात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 19:51 IST2020-07-04T19:51:22+5:302020-07-04T19:51:47+5:30

हिमायतनगर तालुक्यात  जवळगाव मंडळात 66 मिमी  पाऊस झाला आहे.

Rains accelerated in Nanded; Excessive rainfall in Jawalgaon Mandal | नांदेडमध्ये पावसाने वेग घेतला; जवळगाव मंडळात अतिवृष्टी

नांदेडमध्ये पावसाने वेग घेतला; जवळगाव मंडळात अतिवृष्टी

नांदेड : जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात शुक्रवारी अतिवृष्टीची नोंद  झाली आहे.  जवळपास 10 ते  15 दिवसाच्या  विश्रांतीनंतर पावसाने  हळूहळू  वेग घेतल्याचे चित्र जिल्हाभरात आहे. शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत सरासरी 11.87 मिमी  पावसाची नोंद  जिल्ह्यात झाली होती.
 

हिमायतनगर तालुक्यात  जवळगाव मंडळात 66 मिमी  पाऊस झाला आहे. हदगाव तालुक्यात गुरुवारी एका मंडळात अतिवृष्टी झाली होती. त्यापाठोपाठ हिमायतनगर तालुक्यातही एका मंडळात अतिवृष्टी झाली आहे. शुक्रवारी सर्वाधिक 54.33 मिमी पाऊस हिमायतनगर तालुक्यात झाला आहे. बिलोली तालुक्यात 24.20, किनवट तालुक्यात 17.86, धर्माबाद तालुक्यात 19, नांदेड तालुक्यात 15.63, उमरी 14.33 मिमी आणि नायगाव  तालुक्यात 14.60 मिमी  पावसाची नोंद झाली आहे .

Web Title: Rains accelerated in Nanded; Excessive rainfall in Jawalgaon Mandal