नांदेड: दक्षिण मध्य रेल्वेच्यानांदेड विभागाने तिकीट तपासणी मोहिमेत एप्रिल २०२६ मध्ये आतापर्यंतचा सर्वोच्च महसूल जमा केला आहे. विभागाने या मोहिमेद्वारे १.५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले असून, ही मागील वर्षाच्या तुलनेत मोठी झेप मानली जात आहे. एप्रिल २०२५ मध्ये हे उत्पन्न १.३४ कोटी रुपये होते, त्या तुलनेत यंदा १२ टक्क्यांची उल्लेखनीय वाढ नोंदविण्यात आली आहे.
२३ एप्रिलला एकाच दिवसात लाखोची कमाई
या मोहिमेत २३ एप्रिल २०२६ हा दिवस विशेष ठरला. या एकाच दिवशी तिकीट तपासणी मोहिमेतून रेल्वेला ७.९१ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी विभागाने विशेष पथके तैनात केली होती. कर्मचाऱ्यांची कर्तव्यनिष्ठा आणि शिस्तबद्ध नियोजनामुळे हा उच्चांक गाठता आला आहे.
विभागीय व्यवस्थापकांकडून कौतुक
विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांनी या यशस्वी कामगिरीबद्दल सर्व तिकीट तपासणी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे विशेष कौतुक केले आहे. विनातिकीट प्रवास रोखण्यासोबतच प्रवाशांना अधिक चांगल्या सेवा देण्यावर रेल्वेचा भर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आगामी काळातही ही मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
Web Summary : Nanded Railway Division hit a record ₹1.5 crore in ticket revenue during April. A single day earned ₹7.91 lakh. The railway aims to curb ticketless travel.
Web Summary : नांदेड़ रेलवे विभाग ने अप्रैल में टिकट राजस्व में ₹1.5 करोड़ का रिकॉर्ड बनाया। एक ही दिन में ₹7.91 लाख कमाए। रेलवे का लक्ष्य बिना टिकट यात्रा पर अंकुश लगाना है।