शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
2
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
3
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
4
Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी
5
अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!
6
मुंबई इंडियन्सच्या जखमेवर मीठ! Quinton de Kock आणि Raj Angad Bawa आयपीएलमधून बाहेर!
7
Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
8
NEET Paper Leak : डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला सुरू करायचे होते मेडिकल कॉलेज! नीट घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक खुलासा
9
Travel : सकाळी कडक ऊन, संध्याकाळी बर्फवृष्टी! 'या' ५ जादुई जागांवर एकाच दिवसात बदलतात ऋतू
10
Shivraj Motegaonkar: 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये?
11
Litton Das: "कोलकाताच्या संघात माझ्यासोबत जे घडलंय ते..." बांगलादेशी क्रिकेटर लिटन दासचे गंभीर आरोप!
12
प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतीकार? सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यासोबत पार पडली बैठक
13
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
14
Twisha Sharma : MBA, योगा ट्रेनर, मॉडेल-अ‍ॅक्टर होती ट्विशा शर्मा; ज्या तारखेला लग्न झालं, त्याच दिवशी जग सोडलं
15
महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले
16
Sex Racket: नोकरीचं आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ढकललं; ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ६ जणींची सुटका!
17
पुतिन यांच्या चीन दौऱ्याचा मोठा गेमप्लॅन; जिनपिंग यांच्याकडून 'या' महाप्रकल्पाला मंजुरी मिळवणार!
18
भारती सिंह घटस्फोट घेणार? हर्ष लिंबाचियासोबत बिनसल्याच्या चर्चांवर म्हणाली, "आम्ही दोघं..."
19
ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
20
हृदयद्रावक! कारच्या मागच्या सीटवर झोपलेल्या नातीला आजोबा विसरले; गुदमरून चिमुकलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडचे महापौर पद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी; कल्याणकर, मुळे, काळे की आणखी कुणाला संधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 18:46 IST

उत्तर विधानसभा मतदारसंघात संधी मिळणार की दक्षिणमध्ये? खासदार अशोकराव चव्हाण यांच्या भूमिकेकडे लागल्या नजरा

नांदेड : नांदेड महापालिकेच्या महापौर पदासाठी यंदा सर्वसाधारण महिला प्रवर्ग राखीव झाल्याने इच्छुकांकडून लॉबिंग सुरू झाली आहे. भाजपचे बहुमत असल्याने महापौर भाजपचाच असेल, हे निश्चित आहे. हा बहुमान कुणाला मिळणार? विशेष म्हणजे, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या निर्णयाकडे इच्छुकांसह नांदेडकरांच्या नजरा लागल्या आहेत.

महापालिकेत भाजपचे एकूण ४५ नगरसेवक असून, त्यात विविध प्रवर्गांतून निवडून आलेल्या तब्बल २६ महिलांचा समावेश आहे. पण, सर्वसाधारणमधून चार ते पाच नावे आघाडीवर आहेत. भाजप प्रथमच नांदेड महापालिकेवर सत्ता स्थापन करत असल्याने ‘पहिला भाजप महापौर’ होण्याची संधी मिळवण्यासाठी इच्छुकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.

महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी सुटेल, या अपेक्षेवर अनेकांचे डोळे लागले होते; मात्र महिला आरक्षण जाहीर होताच त्यांच्या अपेक्षाभंग झाल्या आहेत. आता सर्वसाधारण महिला प्रवर्गातून कोणत्या नगरसेविकेच्या गळ्यात महापौर पदाचा हार पडणार, याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. माजी महापौरांना पुन्हा संधी द्यायची, की नव्या दमाच्या चेहऱ्याला पुढे करायचे, हा प्रश्न भाजप नेतृत्वासमोर उभा आहे. अशोकराव चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर संपूर्ण जिल्हा भाजपमय करण्याचा निर्धार केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर नांदेड महापालिकेचा महापौर पदाचा निर्णय हा केवळ शहरापुरता मर्यादित न राहता आगामी जिल्हा परिषद आणि ग्रामीण राजकारणावर परिणाम करणारा ठरणार आहे.

उत्तर नांदेडमध्ये ‘शह-काटशह’ची खेळी!
उत्तर नांदेडमधून महापौर पदाची संधी दिली गेल्यास ज्योती कल्याणकर आणि कविता मुळे यांची नावे आघाडीवर आहेत. दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या ज्योती कल्याणकर यांना महापौर केल्यास शिंदेसेनेचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांना राजकीय शह दिला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे, अशोकराव चव्हाण भाजपमध्ये आल्यानंतर या दोन्ही नगरसेविकांनी कोणतीही अट न ठेवता त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ‘उत्तर’ला संधी द्यायची झाल्यास ही नावे महत्त्वाची ठरू शकतात.

अनुभव की नवखे नेतृत्व?
अनुभवाच्या निकषावर विचार केल्यास माजी महापौर जयश्री पावडे यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. त्यांचा प्रदीर्घ अनुभव, ग्रामीण व शहरी भागातील प्रभाव आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुकांचे गणित पाहता पावडे यांना संधी मिळू शकते. मात्र, माजी महापौर शैलजा स्वामी यांच्या शक्यतांबाबत साशंकता आहे. कारण त्यांचे पती किशोर स्वामी यांना स्थायी समिती सभापतीपद देण्याचा विचार होऊ शकतो. अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेल्या शीला भवरे यांना पुन्हा संधी मिळेल, असे दिसत नाही.

दक्षिण नांदेडमधून पाच दावेदार!
नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मनप्रीतकौर कुंजीवाले, सुवर्णा बस्वदे, दीपाली मोरे, अनुराधा काळे आणि मंगला देशमुख यांची नावे चर्चेत आहेत. दक्षिणमध्ये संधी द्यायची झाल्यास कुंजीवाले किंवा अनुराधा काळे यांना ‘साहेबांचा’ हिरवा कंदील मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. सामाजिक समतोल साधण्याच्या दृष्टीने शीख समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो.

जुन्या-नव्यांमध्ये संघाची भूमिकाही निर्णायक
संघाच्या विचारसरणीत वाढलेल्या आणि सर्वात कमी वयाच्या नगरसेविका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शांभवी साले यांचे नावही चर्चेत आहे. नव्या दमाच्या, स्वच्छ प्रतिमेच्या आणि संघाशी नाळ जुळलेल्या चेहऱ्याला संधी द्यायची झाल्यास किमान सव्वा वर्षासाठी तरी साले यांना महापौर पदाची संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे. तर पूर्वीपासून भाजपमध्ये असलेल्या सुदर्शना खोमणे, दीपाली मोरे, वैशाली देशमुख यांचाही विचार केला जाऊ शकतो. महापौर निवडीमध्ये खासदार डाॅ. अजित गोपछडे, मराठवाडा संपर्कप्रमुख संजय कौडगे यांचीही भूमिकादेखील निर्णायक ठरू शकते.

अडीच-अडीच की सव्वा-सव्वा वर्षांचा डाव?
महापौर पदाचा कार्यकाळ अडीच-अडीच वर्षांचा की सव्वा-सव्वा वर्षांचा राहणार, यावरही राजकीय हालचाली अवलंबून आहेत. पहिल्या टप्प्यात मराठा समाजातील चेहऱ्याला संधी देऊन ग्रामीण भागात फायदा साधण्याची रणनीती आखली जाऊ शकते. त्यानंतर सामाजिक संतुलन साधत दुसऱ्या समाजाला प्रतिनिधित्व दिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Nanded Mayor Post Reserved for Women: Who Will Get the Chance?

Web Summary : Nanded's mayoral race heats up as the seat is reserved for women. BJP's majority makes it their game, with Ashok Chavan's decision crucial. Several women councilors are in contention, balancing experience, new faces, and social equations.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Nanded Waghala Municipal Corporation Electionनांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६BJPभाजपा