वसंत शिरभाते यांना संगीतमय श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:18 IST2020-12-31T04:18:15+5:302020-12-31T04:18:15+5:30

प्रा. रामप्रसाद तौर आणि डॉ. अशोक बेलखोडे यांनी प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन केले. उद्योन्मुख तबलावादक श्रीकर मुक्कावार, तेजस्विनी उईके, ...

Musical tribute to Vasant Shirbhate | वसंत शिरभाते यांना संगीतमय श्रद्धांजली

वसंत शिरभाते यांना संगीतमय श्रद्धांजली

प्रा. रामप्रसाद तौर आणि डॉ. अशोक बेलखोडे यांनी प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन केले. उद्योन्मुख तबलावादक श्रीकर मुक्कावार, तेजस्विनी उईके, श्रेयश कोंडे ,प्रज्योत कांबळे, सर्वज्ञ सूर्यवंशी, गौरव सोनी यांच्या तबलावादनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कृष्णा साटलवार या बाल कलाकाराने बासरीवादन केले. वामनदादा कर्डक संगीत अकादमीचे गायक सुरेश पाटील यांनी कोण तुझ सम सांग मझ गुरुराया या गुरुजींच्या आवडीच्या पदाने व मेरे देश की धरती या देशभक्ती गीताने प्रथम पुष्प वाहिले. आम्रपाली वाठोरे यांनी संत विष्णुदास रचित माझी रेणुका माऊली, रसिका कैसे गाऊ गीत, माझिया मना हे भावगीत, तर युवा गायक विशाल शेरे यांनी हे सुरांनो चंद्र व्हा नाट्यगीत तयारीनिशी सादर केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात बाजाराला गवळण, लहानपण देगा देवा व मोसम बिया जाय या प्रसिद्ध भैरवीने अश्रुपूर्ण नयनांनी सुरेश पाटील यांनी समारोप केला. तबला संगत शिवकुमार कोंडे, व्यंकट मुंडावरे, ढोलकी साहेबराव वाढवे यांनी साथ केली. कार्यक्रमाचे निवेदन प्रा. डॉ. सुनील व्यवहारे यांनी केले. उत्तम कानिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. उमेश देशपांडे (नांदेड), प्रा. डॉ. पंजाब शेरे, चित्रकार शिवराज बामणीकर, सुनील पाठक, सुलोचना कोंडे, वंदना सदावर्ते, गजानन लाठकर ,ज्ञानेश्वर उईके यांसह संगीत रसिक उपस्थित होते.

Web Title: Musical tribute to Vasant Shirbhate