शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
3
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
4
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
5
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
6
हॉरिबल! आठ महिन्यांचे बाळ गच्चीवर पडलेले, लोकांनी आईला एवढे ट्रोल केले, तिने आयुष्यच संपविले
7
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
8
तुमच्या आयुष्यातील प्रश्न सुटत नाहीयेत? भगवान बुद्ध सांगताहेत कायमस्वरूपी उपाय!
9
बापरे! गुजरातच्या चहा विक्रेत्याला आयकर विभागाने पाठवली ४९ कोटींची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
10
Nrusimha Jayanti 2024: उत्तराखंडच्या नृसिंह मंदिरातील मूर्तीचा थेट संबंध प्रलयाशी? वाचा रोचक माहिती!
11
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
12
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
13
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
14
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
15
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
16
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
17
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
18
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
19
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
20
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...

Maharashtra Election 2019 : प्रचारासाठी दसऱ्याचा मुहूर्त; शुभेच्छा देण्यासाठी उमेदवारांची लागली चढाओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2019 5:54 PM

सोशल मीडियावरही उमेदवारांत शुभेच्छा देण्यासाठी चढाओढ लागली होती.

नांदेड : सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर मंगळवारचा दिवस हा खऱ्या अर्थाने प्रचाराचा पहिला दिवस होता. याच दिवशी दसरा आणि सोबत धम्मचक्र प्रवर्तन दिन असल्याने विधानसभेच्या उमेदवारांनी मतदारांना शुभेच्छा देत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावरही उमेदवारांत शुभेच्छा देण्यासाठी चढाओढ लागली होती.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे बारा दिवस मिळत आहेत. काही उमेदवारांनी निवडणुकीची पूर्वतयारी केलेली असली तरी बहुतांश उमेदवारांचे तिकीट शेवटच्या क्षणी निश्चित झालेले असल्याने अशा नवख्या उमेदवारांना मतदारसंघातील सव्वादोन ते अडीच लाख मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. प्रमुख पक्षांनी प्रचाराचे नियोजन सुरू केले असले तरी अद्यापही प्रचारामध्ये रंग भरलेला नाही. त्यातच दसऱ्यासारखा मोठा सण आणि सोबतीला धम्मचक्र प्रवर्तन दिन असल्याने मंगळवारी उमेदवारांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून दसऱ्याबरोबरच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी पुढाकार घेतला.  दिवसभर व्हॉटसअ‍ॅप, फेसबुकवरही उमेदवारांसह समर्थकांचे शुभेच्छा संदेश फिरत होते. 

दरम्यान, जिल्ह्यातील नऊ मतदारसंघात तब्बल १३५ जण रिंगणात असून सर्वाधिक ३८ उमेदवार नांदेड दक्षिणमध्ये आहेत. त्यामुळे या मतदारसंघात प्रचाराने वेग घेतलेला दिसतो. प्रमुख उमेदवारांसह अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांनीही मंगळवारी गृहभेटीवर भर दिल्याचे दिसून आले. याबरोबरच कॉर्नर बैठकांनाही सुरुवात झाली असून काही उमेदवार मात्र अद्यापही प्रचाराचे नियोजन करण्यातच व्यस्त असल्याचे चित्र आहे. दरम्यान, प्रमुख पक्षांकडून जंगी  सभांचे नियोजन सुरू झाले असून त्यानंतरच खऱ्या अर्थाने प्रचारामध्ये रंगत येणार आहे. सध्यातरी मतदारसंघातील प्रत्येक गावात किमान एक भेट व्हावी, यासाठी उमेदवारांचे प्रयत्न सुरू आहेत.

उमेदवारांना पावसाची भीतीयंदा राज्यभरात चांगला पाऊस झालेला आहे. नांदेड जिल्ह्यातही पावसाने ८२५ मि.मी.चा टप्पा पार केलेला आहे. मराठवाड्यात परतीचा पाऊस चांगला पडतो. त्यातच हवामान विभागाने बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असे तीन दिवस पावसाचे असल्याचे म्हटले आहे. या दिवसात मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मोठा पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला असल्याने प्रमुख पक्षांसह उमेदवारांचीही चिंता वाढलेली आहे. यंदा प्रचारासाठी मोजकेच दिवस मिळत आहेत. त्यातच पावसाने हजेरी लावल्यास प्रचारावर परिणाम होणार आहे. विशेषत: जंगी, सभा व मेळाव्याचे आयोजन करणाऱ्यांनी पावसाची धास्ती घेतली आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NandedनांदेडPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभा