गौतम लंकेंना मधुकर लोंढे स्मृती पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:12 IST2021-01-01T04:12:46+5:302021-01-01T04:12:46+5:30

पत्रकारांचे राज्य पातळीवरचे संघटन असलेल्या आॕॅल जर्नालिस्ट अॕॅन्ड फ्रेंड सर्कल या संघटनेकडून प्रतिवर्षी ज्येष्ठ पत्रकार मधुकर लोंढे राज्यस्तरीय पुरस्कार* ...

Madhukar Londhe Smriti Award to Gautam Lanka | गौतम लंकेंना मधुकर लोंढे स्मृती पुरस्कार

गौतम लंकेंना मधुकर लोंढे स्मृती पुरस्कार

पत्रकारांचे राज्य पातळीवरचे संघटन असलेल्या आॕॅल जर्नालिस्ट अॕॅन्ड फ्रेंड सर्कल या संघटनेकडून प्रतिवर्षी ज्येष्ठ पत्रकार मधुकर लोंढे राज्यस्तरीय पुरस्कार* दिला जातो. यंदाचा हा पुरस्कार* पत्रकार गौतम लंके यांना गुरुवारी जाहीर झाल्याची घोषणा केंद्रीय अध्यक्ष यासीन पटेल यांनी केली. पत्रकार लंके यांनी १० वर्षांपासून बातमीद्वारे वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केला. शोधपत्रकारिता, दुर्लक्षित विषय हाताळून न्याय देण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे आॕॅल जर्नालिस्ट अॕॅन्ड फ्रेंड सर्कल या राष्ट्रव्यापी पत्रकार संघटनेने यंदाचा ज्येष्ठ पत्रकार मधुकर लोंढे स्मृती पुरस्कार लंके यांना जाहीर केला आहे. विदर्भातील अचलपूर जिल्हा अमरावती येथे दर्पण दिनी अर्थात ६ जानेवारी रोजी पत्रकारांच्या संमेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पत्रकार लंके यांचे केंद्रीय अध्यक्ष यासीन पटेल, अतुल होनकळसे, माधव अंकलगे, गणेश कोळी, युयुत्सु आर्ते, प्रदेशाध्यक्ष अजिंक्य गोवेकर, प्रदेश सरचिटणीस जुल्फीकार काझी, प्रदेश कार्याध्यक्ष नितीन गुंजाळकर, सत्यवान विचारे, समीर कुरेशी आदींनी अभिनंदन केले तर लंके यांचे स्थानिक पातळीवर ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र कांबळे, हाई पटेल, विठ्ठल चंदनकर, कुंडलवाडी येथील वार्ताहर कल्याण गायकवाड, बस्वराज वाघमारे, प्रकाश पोवाडे, संदीप गायकवाड आदींनी स्वागत केले.

Web Title: Madhukar Londhe Smriti Award to Gautam Lanka