शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अमर रहे! देगलूरचे सुपुत्र शहीद जवान सचिन वनंजे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 15:53 IST

जवान सचिन वनंजे कर्तव्यावर असताना श्रीनगर येथे 6 मे रोजी शहीद झाले होते.

- शेख शब्बीरदेगलूर: "सचिन वनंजे अमर रहे!", "भारत माता की जय!" अशा घोषणा देत देगलूरमधील शहीद जवान सचिन वनंजे (29) यांच्यावर शुक्रवारी सकाळी 10:30 वाजता नगरपरिषद शेजारील मोकळ्या जागेत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान सचिन वनंजे कर्तव्यावर असताना श्रीनगर येथे 6  मे रोजी एका अपघातात शहीद झाले होते.

सचिन वनंजे हे देगलूर तालुक्यातील तमलूर येथील मूळ रहिवासी असून सध्या फुलेनगर, देगलूर येथे वास्तव्यास होते. जम्मू-काश्मीर येथे आपल्या सहकाऱ्यांसह नियोजित पोस्टकडे जात असताना त्यांच्या सैनिकी वाहनाचा खोल दरीत अपघात होऊन मंगळवार, दि. 6 मे रोजी ते शहीद झाले. त्यांचे पार्थिव शुक्रवारी पहाटे 4 वाजता हैदराबादहून देगलूर येथे त्यांच्या घरी पोहोचवण्यात आले.

सकाळी 8:30 वाजता फुलांनी सजवलेल्या सैनिकी वाहनात त्यांची अंत्ययात्रा सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, अण्णाभाऊ साठे चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, गांधी चौक, देगाव नाका, संत रविदास चौक आदी मार्गे अंत्ययात्रा नगरपरिषदेच्या शेजारी पोहोचली. येथे सैन्य दलाच्या वतीने हवेत गोळीबार करत मानवंदना देण्यात आली. बौद्ध धर्मगुरु भंते रेवतबोधी यांच्या मार्गदर्शनाखाली अंत्यविधी पार पडला. 

या अंत्यसंस्कारावेळी खासदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार जितेश अंतापुरकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी संकेत गोसावी, तहसीलदार भरत सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक मारोती मुंडे, माजी आमदार, राजकीय नेते, अधिकारी-कर्मचारी, तसेच हजारोंचे जनसमुदाय उपस्थित होता.

शहीद जवान मागे ठेवून गेले कुटुंबसचिन वनंजे यांनी 2017 मध्ये भारतीय सैन्य दलात प्रवेश केला होता. त्यांची पहिली नियुक्ती सियाचीनमध्ये झाली होती. त्यानंतर त्यांनी जालंधर (पंजाब) आणि सध्या श्रीनगर येथे सेवा बजावली होती. मार्च महिन्यात ते सुट्टीवर आले होते आणि एप्रिलमध्ये पुन्हा ड्युटीवर हजर झाले. त्यांचे लग्न 2022 मध्ये झाले असून त्यांना फक्त आठ महिन्यांची मुलगी आहे. त्यांच्या आई गृहिणी असून वडील खाजगी वाहन चालक आहेत.

टॅग्स :NandedनांदेडMartyrशहीदIndian Armyभारतीय जवान