कल्याणकरांचे नगरसेवकपद रद्द, नांदेड न्यायालयाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:17 AM2021-03-07T04:17:08+5:302021-03-07T04:17:08+5:30

मतमोजणीदरम्यान काही पोस्टल मतपत्रिका फाटल्यामुळे त्या रद्द केल्या होत्या. मोरताळे यांनी आपल्या आक्षेपात पोस्टात मतदान पत्रिका टाकताना त्या फाटल्या ...

Kalyankar's corporator post canceled, Nanded court decision | कल्याणकरांचे नगरसेवकपद रद्द, नांदेड न्यायालयाचा निर्णय

कल्याणकरांचे नगरसेवकपद रद्द, नांदेड न्यायालयाचा निर्णय

Next

मतमोजणीदरम्यान काही पोस्टल मतपत्रिका फाटल्यामुळे त्या रद्द केल्या होत्या. मोरताळे यांनी आपल्या आक्षेपात पोस्टात मतदान पत्रिका टाकताना त्या फाटल्या असतीलश तर रद्द करता येणार नाहीत, असा मुद्दा मांडला होता. या आक्षेपानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांच्या उपस्थितीत पोस्टल मतांची मोजणी केली होती. त्याबाबतच अहवाल पठाण यांनी न्यायालयाला सादर केला होता. त्यानंतर झालेल्या सुनावणीनंतर दिवाणी न्यायाधीश रवींद्र करंकाळ यांनी काँग्रेसचे दिनेश मोरताळे यांना विजयी घोषित केले आहे. त्यामुळे कल्याणकर यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे.

या याचिकेत मोरताळे यांची बाजू ॲड. व्ही.डी. पाटनूरकर आणि ॲड. सुभाष भोसले यांनी मांडली, तर कल्याणकर यांची बाजू ॲड. व्ही.एम. देशमुख यांनी मांडली.

चौकट - कल्याणकर पुढे झाले आमदार

महापालिकेत शिवसेनेचे एकमेव नगरसेवक म्हणून निवडून आलेले बालाजी कल्याणकर हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडूनच नांदेड उत्तरमधून विजयी झाले आहेत. या विजयानंतरही त्यांनी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिला नव्हता. मोरताळे यांनी मनपा निवडणुकीच्या निकालापासूनच आपला विजय झाला असल्याची खात्री बाळगली होती. न्यायालयात त्यांनी लढाही दिला. या लढ्याला अखेर यश मिळाल्याचे स्पष्ट होत आहे.

Web Title: Kalyankar's corporator post canceled, Nanded court decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.