श्रीराम मंदिर निर्माण अभियान कार्यालयाचे उद्‌घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:18 IST2020-12-31T04:18:35+5:302020-12-31T04:18:35+5:30

श्रीराम मंदिर निर्माणासाठी गावपातळीपर्यंत रचना लावण्यात आली असून, प्रत्येक गावात निधीप्रमुख नेमण्यात आला. प्रत्येक प्रभागाची प्रभागप्रमुख आणि त्याखाली पाच ...

Inauguration of Shriram Temple Construction Mission Office | श्रीराम मंदिर निर्माण अभियान कार्यालयाचे उद्‌घाटन

श्रीराम मंदिर निर्माण अभियान कार्यालयाचे उद्‌घाटन

श्रीराम मंदिर निर्माणासाठी गावपातळीपर्यंत रचना लावण्यात आली असून, प्रत्येक गावात निधीप्रमुख नेमण्यात आला. प्रत्येक प्रभागाची प्रभागप्रमुख आणि त्याखाली पाच जणांचा गट बनवण्यात आला. प्रत्येक गावातून समाजाच्या सर्व स्तरातून या अभियानाला पाठिंबा मिळावा म्हणून प्रचार यंत्रणा राबविण्यात येणार आहे. हे अभियान १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२१या दरम्यान चालणार आहे. या अभियानासाठी समिती गठीत करण्यात आली असून, अभियानाचे जिल्हाध्यक्ष म्हणून विनोद सुंकरवार, उपाध्यक्ष श्यामबापू भारती महाराज माहुर, अभियान प्रमुख संतोष रायेवार, सहअभियान प्रमुख रमेश श्रीमंगले, किनवट शहर अभियान प्रमुख स्वागत आयनेनिवार आणि अन्य व्यक्तिंना दायित्व देण्यात आले. १५ जानेवारी रोजी शोभायात्रा सुरू होणार आहे. शोभायात्रेचा समारोप राम मंदिर, किनवट येथे होणार आहे.

Web Title: Inauguration of Shriram Temple Construction Mission Office