सलाईनवर असलेली आरोग्य यंत्रणा झाली ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:18 IST2020-12-31T04:18:28+5:302020-12-31T04:18:28+5:30

नांदेड : अर्थसंकल्पात दरवर्षी आरोग्य या विषयाला दुय्यम स्थान दिले जाते. त्यासाठी ठेवण्यात येणारा निधीही तुटपूंजाच असतो. त्यामुळे राज्यातील ...

The health system on the saline was cool | सलाईनवर असलेली आरोग्य यंत्रणा झाली ठणठणीत

सलाईनवर असलेली आरोग्य यंत्रणा झाली ठणठणीत

नांदेड : अर्थसंकल्पात दरवर्षी आरोग्य या विषयाला दुय्यम स्थान दिले जाते. त्यासाठी ठेवण्यात येणारा निधीही तुटपूंजाच असतो. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा कमकुवत झाली आहे. त्यातच कोरोनासारख्या महामारीने नांदेड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा कमकुवतपणा चव्हाट्यावर आणला होता. परंतु, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने तातडीने उचललेल्या पावलांमुळे सलाईनवर असलेली आरोग्य यंत्रणा आता ठणठणीत झाली आहे. कोरोनाच्या संकटामुळे का होईना, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने कात टाकली आहे. नांदेडमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय, श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय, आयुर्वेदिक रुग्णालय यासह ग्रामीण भागात रुग्णालयांची मोठी साखळी आहे. परंतु, कोरोनाच्या संकटात पहिल्या टप्प्यातच या सर्व आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा उघड्या पडल्या होत्या. कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असताना रुग्णांना खाटा, इंजेक्शन मिळणेही अवघड झाले होते. सगळीकडेच गोंधळाचे वातावरण होते. परंतु, प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने पावले उचलली. जिल्हाधिकारी विपीन ईटणकर, आयुक्त डॉ. सुनील लहाने, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, डॉ. अजितपालसिंग संधू, डॉ. वाय. एच. चव्हाण यांच्यासह असंख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिवस-रात्र एक करुन यंत्रणा उभी केली. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनीही गरज पडली त्यावेळेस निधी उपलब्ध करुन देणे असो किंवा ऑक्सिजन, इंजेक्शन यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला. त्यामुळे अनेक गंभीर रुग्णांचे प्राण वाचले. कोरोना काळातच वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन टँक उभे राहिले. दोनशे खाटांचे रुग्णालय कार्यान्वित झाले. अतिरिक्त खाटा, व्हेंटिलेटर यासह इतर यंत्रसामुग्री मोठ्या प्रमाणात मिळाली. त्याचबरोबर रिक्त असलेल्या जागांवर भरतीही करण्यात आली. कोरोना काळात यंत्रणेने घेतलेल्या परिश्रमांमुळेच आजघडीला रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. कोरोनामुुळे खऱ्या अर्थाने नांदेडमधील आरोग्य यंत्रणेने कात टाकली आहे.

Web Title: The health system on the saline was cool