सामान्य ज्ञान परीक्षेचा निकाल घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:18 IST2020-12-31T04:18:53+5:302020-12-31T04:18:53+5:30

या परीक्षेसाठी प्राचार्या डॉ. ए. आर. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आर.डब्ल्यू नवघडे यांनी बहुपर्यायी प्रश्नावलीची निर्मिती केली. माजी प्र.प्रचार्य ...

General knowledge test results announced | सामान्य ज्ञान परीक्षेचा निकाल घोषित

सामान्य ज्ञान परीक्षेचा निकाल घोषित

या परीक्षेसाठी प्राचार्या डॉ. ए. आर. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आर.डब्ल्यू नवघडे यांनी बहुपर्यायी प्रश्नावलीची निर्मिती केली. माजी प्र.प्रचार्य सु. ग. जाधव व डॉ. एम. आर. जाधव यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेसाठी मुख्याध्यापिका एम. एन. जैस्वाल, मुख्याध्यापक पी. आर. कानडे, एस. एल. माचलोड, जी.बी.जाधव, जी. एस. भुस्से, एस. के. तायडे यांनी परिश्रम घेतले.

स्पर्धेत श्री शारदा भवन अध्यापक महाविद्यालय, कुसुमताई चव्हाण डी. एड.कॉलेज, महात्मा फुले हायस्कूल बाबानगर, महात्मा फुले हायस्कूल, विजयनगर, सावित्रीबाई फुले हायस्कूल बाबानगर, श्री शारदा भवन हायस्कूल जुनामोंढा, इंदिरा गांधी हायस्कूल सिडको, भाऊराव चव्हाण हायस्कूल लक्ष्मीनगर, देगाव, येळेगाव, अध्यापक विद्यालयातील व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ४३१ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन तर ५९ विद्यार्थ्यांनी ऑफलाईन सहभाग घेतला.

Web Title: General knowledge test results announced