गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात महाआरोग्य शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:18 IST2020-12-31T04:18:22+5:302020-12-31T04:18:22+5:30

किनवट : तालुक्यातील गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात दिनांक ६ ते ९ जानेवारी असे चार दिवस मोफत वैद्यकीय व दंत ...

General Health Camp at Gokunda Sub-District Hospital | गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात महाआरोग्य शिबिर

गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात महाआरोग्य शिबिर

किनवट : तालुक्यातील गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात दिनांक ६ ते ९ जानेवारी असे चार दिवस मोफत वैद्यकीय व दंत महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.

आदिवासी भागातील गरीब व गरजू रुग्णांसाठी राष्ट्रीय ग्रामीण अभियानांतर्गत होणाऱ्या या महाआरोग्य शिबिरात विशेष तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करणार आहेत. शिबिरात हायड्रोसिल, हर्निया, अपेंडिक्स, शरीरावरील सर्व गाठींची शस्त्रक्रिया व दंतचिकित्सा यावरील औषधोपचार करण्यात येणार आहेत. तसेच रुग्णांची मोफत ईसीजी, एक्स-रे, सोनोग्राफी होणार आहे. या शिबिराला आरोग्य सेवा, लातूरचे उपसंचालक डॉ. एकनाथ डी. माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर उपस्थित राहणार आहेत. या शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम धुमाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.

Web Title: General Health Camp at Gokunda Sub-District Hospital