कोरोनाची मोफत तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:32 AM2021-03-04T04:32:05+5:302021-03-04T04:32:05+5:30

रस्त्याच्या कामाचा शुभारंभ उमरी - तालुक्यातील इज्जतगाव पट्टी ते दिलावर पूल या पांदण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच झाला. कार्यक्रमाला ...

Free corona checkup | कोरोनाची मोफत तपासणी

कोरोनाची मोफत तपासणी

Next

रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

उमरी - तालुक्यातील इज्जतगाव पट्टी ते दिलावर पूल या पांदण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच झाला. कार्यक्रमाला तलाठी जाधव, तांत्रिक अधिकारी कदम, सरपंच बालाजीराव ढगे, उपसरपंच राजू पाटील, रमेश ढगे, कैलास ढगे, माधव ढगे आदी उपस्थित होते.

नरहरी महाराज पुण्यतिथी

मुदखेड - येथील संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम विठ्ठल मंदिरात झाला. यानिमित्त महाप्रसादही वाटप करण्यात आला. सोनार समाजाचे अध्यक्ष लक्ष्मणराव शहाणे, उपाध्यक्ष सुरेश शहाणे, सदाशिव शहाणे, चंद्रकांत शहाणे, रमाकांत शहाणे, नारायण डहाळे, राजू डहाळे, संतोष टाक, प्रशांत शहाणे, गिरीश कोत्तावार, मुकेश मामीडवार, राघवेंद्र पबितवार, गजानन कदम आदी उपस्थित होते.

रविदास महाराज जयंती

नांदेड - देगावचाळ येथील प्रज्ञा करुणा विहारात संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चर्मकार समाजाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड, तर प्रमुख अतिथी म्हणून कृष्णा गजभारे, गंगाधर वडणे, राहुल कोकरे, भय्यासाहेब गोडबोले, जयंती मंडळाचे अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक अशोक हटकर, गंगाधर ढवळे, ॲड. नितीन थोरात आदी उपस्थित होते.

संजय जाधव यांना अभिवादन

नांदेड - पत्रकार संजय जाधव यांना द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेविका बेबीताई गुपिले, माजी नगरसेवक अशोक मोरे, जीवन पाटील घोगरे, संजय पाटील, विठ्ठल गायकवाड, माधव पाटील, डॉ. प्रणिता बोकारे, अवधूत पाटील, जी.पी. पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Free corona checkup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.