माजी मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 12:47 AM2018-12-05T00:47:56+5:302018-12-05T00:50:27+5:30

इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्राअंतर्गत असलेल्या पैनगंगेवरील डावा व उजव्या कालव्याची व चा-यांची दुरुस्ती येत्या १५ दिवसात करण्याची मागणी माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांनी अप्पर पैनगंगा प्रकल्पाचे मुख्य अभियंता यांच्याकडे केली.

Former ministers held the officers | माजी मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

माजी मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

Next
ठळक मुद्देइसापूरच्या पाण्याचा प्रश्न माजी मंत्री गावंडे यांनी घेतली अधीक्षकांची भेट

नांदेड : इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्राअंतर्गत असलेल्या पैनगंगेवरील डावा व उजव्या कालव्याची व चा-यांची दुरुस्ती येत्या १५ दिवसात करण्याची मागणी माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांनी अप्पर पैनगंगा प्रकल्पाचे मुख्य अभियंता यांच्याकडे केली. यावेळी अधिका-यांना धारेवर धरत शेतक-यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप गावंडे यांनी केला आहे़
इसापूरचे पाणी पैनगंगेत सोडण्यासाठी परिसरातील शेतकºयांनी आंदोलन सुरु केले होते़ त्यानंतर पाच दलघमी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला़ मंगळवारी या भागातील शेतकºयांचे शिष्टमंडळ माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांच्या नेतृत्त्वात अधिक्षक अभियंत्यांना भेटले. पैनगंगा नदीपात्रात कायमस्वरुपी पाणी सोडण्यासाठी ४० दलघमी पाणी आरक्षीत करावे़ त्यानंतर टप्या-टप्याने ते सोडून नदीचा नैसर्गिक प्रवाह सुरु ठेवावा, डाव्या कालव्याची त्यावरील नहर व पाटचाºयाच्या अस्तरीकरणाचे अपूर्ण काम पूर्ण करुन या कामासाठी त्वरीत २० कोटी रुपयांचा निधी वर्ग करावा, डाव्या कालव्याचे पाण्यावर होणारा सिंचनाचा अनुशेष भरुन काढावा़ कयाधू शाखा कालव्याचे पूनरुज्जीवन करुन हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील नहराचे काम पूर्ण करावे, हदगाव-हिमायतनगर तालुक्यातील १२ नळयोजना चालू ठेवण्यासाठी नदीमध्ये नियमित पाण्याचा प्रवाह चालू ठेवावा, कालवा समितीच्या होणाºया बैठका इसापूर धरणावर घ्याव्यात आदी मागण्या करण्यात आल्या़
इसापूर निर्मितीनंतर पैनगंगेवर १२ लघुपाटबंधारे प्रकल्प तयार करण्यात आले नसल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरत नसल्याचे अधिकारी सांगतात. पाण्याचे योग्य नियोजन करुन पावसाळ्यात वाहून जाणारे पैनगंगा व कयाधूचे पाणी अडवण्यासाठी वेगळा प्रकल्प तयार केल्यास अधिकचे पाणी उपलब्ध होवू शकेल. तशी मागणी आपण राज्य शासनाकडे करणार असल्याचे गावंडे यांनी स्पष्ट केले. यावेळी दत्ता गंगासागर, चक्रधर पाटील, शंकर तालंगकर, तुकाराम माने, अरविंद माने, भागवत देवसरकर, अविनाश खंदारे, विठ्ठल देशमुख आदी उपस्थित होते.
चा-यांच्या देखभाल अन् दुरुस्तीकडे दुर्लक्ष
इसापूर प्रकल्पाअंतर्गत असलेली जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी १७७ चा-या व कॅनाल तयार करण्यात आले. परंतु गत चाळीस वर्षात या चा-या अथवा कॅनालमधून एकदाही पाणी प्रवाहीत झाले नाही. कॅनॉलची उंची व उतार बरोबर नसल्याने धरणाचे पाणी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाही. देखभाल व दुरुस्तीअभावी चाºयांची दुरवस्था झाली आहे. लोकप्रतिनिधींनी मागण्या रेटल्या असत्या तर त्या केव्हाच पूर्ण झाल्या असत्या असा आरोप गावंडे यांनी केला.

Web Title: Former ministers held the officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.