शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

गावबंदी करणा-यांकडूनच निमंञणाच्या पायघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:24 IST

बिलोली - कोरोनाच्या काळात आपल्या कुटुंबीयांकडे परत आलेल्या बाहेर गावातील लोकांना गाव वेशीवर थांबवत गावबंदी करणा-यांकडूनच नियंञणाच्या पायघड्या अंबरल्या ...

बिलोली - कोरोनाच्या काळात आपल्या कुटुंबीयांकडे परत आलेल्या बाहेर गावातील लोकांना गाव वेशीवर थांबवत गावबंदी करणा-यांकडूनच नियंञणाच्या पायघड्या अंबरल्या जात असून इलेक्शनसाठी गावाकडे या, अशी मनधरणी केली जात असल्याचा प्रकार गाव-खेड्यांमधुन पहावयास मिळत आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्याकरीता अनेक क्लृप्त्या वापरल्या जात असुन हळुहळु निवडणुकीचा ज्वर थंडीतही चढू लागला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात पोटापाण्यासाठी बाहेरगावी गेलेले नागरिक कुटुंबीयांच्या सुरक्षिततेच्या काळजीच्या इराद्याने आपल्या गावाची वाट धरली खरी;परंतु गावातील नागरिकांनी गावच्या वेशी व रस्ते आडवल्याचा कटु अनुभवास सामोरे जावे लागले होते. गावक-यांसमोर गावातील प्रवेशाकरिता हातपाय पसरवुनदेखील त्यांच्या याचनेची कोणी दखल घ्यायला तयार नव्हते.इतकेच काय पोलीसांना पाचारण करण्याच्या धमकीवजा भाषेचा वापर करण्यात आला.कोरोनापासुन जीव वाचवण्यासाठी आपल्या गावात मोठ्या अपेक्षेने परतणा-या नागरीकांना माञ गावबंदी करण्यात आली होती.आपला गाव त्यांना परका झाल्यासारखा होता. आता याच हाकलुन देणा-या नागरिकांची आठवण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने येत असल्याने एकेक मताला किती महत्व प्राप्त होत आहे, याची प्रचिती येताना दिसत आहे. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचा हंगाम सुरु आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहून आपले नशीब आजमावणारे उमेदवार सध्या निवडणुकीपूर्वीच एकेक मतांची जुळवा-जुवळ करण्याची बेरीज गावक-यांकडुन आखण्यात येत आहे.त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनिमित्त बाहेरगावी गेलेल्या मतदारांना व त्यांच्या मतांना महत्व आले आहे.यासाठी कोण कुठे राहायला गेलेले आहे,किती जणांचे मतदान आपल्याला पडेल,याचे नियोजन करण्यावर भर दिले जात असल्याचे दिसत आहे.त्यासाठी त्यांच्या वाहतुकीच्या खर्चासह विविध प्रलोभने दाखवले जात आहे.कोरोनाकाळात जिवाच्या आकांताने भीतीपोटी तालुक्यातील नागरीक मुंबई,पुणे,औरंगाबाद,पुणेसह इतरञ नोकरी,व्यवसायासाठी गेलेले आहेत.अचानक कोरोना महामारीने डोके वर काढल्याने शहरी भागात वास्तव्य करणा-यांना गावाची आठवण झाली.कुटुंबांना घेऊन ते गावाकडे आले;परंतु कोरोनाच्या भीतीने आधीच हादरुन गेलेल्या गावक-यांनी गावात बाहेरच्यांना प्रवेशबंदी केली. राञी-अपराञी तरुणांनी गावाबाहेर खडा पहारा देऊन शहरातील येणा-या लोढ्यांना गावाबाहेर थोपवले होते.आता वाढले महत्व आता याच पाहुण्यांचे ग्रामपंचायत निवडणुकीत महत्व वाढले आहे.ज्यांनी गावबंदी केली,आता तेच मतासाठी इलेक्शनला गावाकडे या म्हणुन पायघड्या घालत आहेत.