नववर्षाच्या स्वागतासाठी भाविक दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:18 IST2020-12-31T04:18:55+5:302020-12-31T04:18:55+5:30

नांदेड- शहरातील शासकीय विश्रामगृह ते मोर चौक या वर्दळीच्या रस्त्याचे रूंदीकरण व दुरूस्तीसह संपूर्ण रस्त्यावरील बंद असलेले स्ट्रेट लाईट ...

Devotees enter for the New Year's reception | नववर्षाच्या स्वागतासाठी भाविक दाखल

नववर्षाच्या स्वागतासाठी भाविक दाखल

नांदेड- शहरातील शासकीय विश्रामगृह ते मोर चौक या वर्दळीच्या रस्त्याचे रूंदीकरण व दुरूस्तीसह संपूर्ण रस्त्यावरील बंद असलेले स्ट्रेट लाईट तातडीने सुरू करण्यात यावीत, अशी मागणी शहर विकास व वाहतूक सुरक्षा समितीच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात मनपा उपायुक्त डॉ. बाबूराव बिक्कड यांना निवेदन देण्यात आले.

पासदगाव ते तरोडा नाका दुभाजक करा

नांदेड- पासदगाव ते तरोडा नाका रस्त्यावर अपघाताच्या घटना घडत असल्यामुळे अनेकजणांचा बळी गेला आहे. प्रशासनाने हा रस्ता दुभाजक करून भविष्यात होणारे अपघात टाळण्यात यावेत, अशी मागणी या भागातील नागरिकांकडून होत आहे. संबंधित नगरसेवकांनी या संदर्भात पाठपुरावा करून हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली आहे.

पतंगाची विक्री

नांदेड- संक्रांतीच्या निमित्ताने शहरात पतंगबाजी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर बंदी असलेल्या प्लास्टिक पंतग आणि नयलाॅन मांजाची विक्री सुरू आहे. प्लास्टिक पंतग आणि नयलॉन मांजा वापराच्या बंदीबाबत एकीकडे जनजागृती होत असतानाच बाजारात काही व्यापारी त्याची विक्री करत आहेत. प्लास्टिक पंतग व मांजामुळे अनेक दुचाकीस्वारांचा अपघात होऊन जीव गमवावा लागला.

Web Title: Devotees enter for the New Year's reception