आकडा टाकताना शॉक लागून विवाहितेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:31 IST2021-03-04T04:31:54+5:302021-03-04T04:31:54+5:30

विवाहिता अनिता संगम जाधव या त्यांच्या राहत्या घराजवळील विद्युत वाहिनीवर वायरचा आकोडा टाकत होत्या. त्याचवेळी त्यांना विजेचा जबर शॉक ...

The death of a married woman due to shock while dropping the figure | आकडा टाकताना शॉक लागून विवाहितेचा मृत्यू

आकडा टाकताना शॉक लागून विवाहितेचा मृत्यू

विवाहिता अनिता संगम जाधव या त्यांच्या राहत्या घराजवळील विद्युत वाहिनीवर वायरचा आकोडा टाकत होत्या. त्याचवेळी त्यांना विजेचा जबर शॉक लागल्यामुळे 'त्या' बेशुद्ध पडल्या. उपचारासाठी विष्णूपुरी, नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना जाधव यांचा मृत्यू झाल्याचे पोलीस ठाणे अंमलदार परमेश्वर कदम व मदतनीस महिला पो. कॉ. पूनम उदगिरे यांनी सांगितले. याप्रकरणी मयत अनिता जाधव यांचे वडील आनंदा सटवाजी राहेरे (रा. पांगरगाव ता. मुदखेड) यांनी २ मार्च रोजी दिलेल्या माहितीआधारे नांदेड ग्रामीण ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोउपनि. गोविंद खैरे व पो.कॉ. शेख उमर हे याप्रकरणाचा तपास करीत आहेत.

Web Title: The death of a married woman due to shock while dropping the figure