CoronaVirus : नांदेड जिल्ह्यात ७,८४१ जणांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 05:42 PM2020-04-04T17:42:35+5:302020-04-04T17:45:24+5:30

१४ दिवस घरात थांबणे बंधनकारक

CoronaVirus: 7841 Home quarantine stamps held in Nanded district | CoronaVirus : नांदेड जिल्ह्यात ७,८४१ जणांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के

CoronaVirus : नांदेड जिल्ह्यात ७,८४१ जणांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के

Next
ठळक मुद्देनांदेड शहरात ४०२५बाहेर दिसल्यास कारवाई

नांदेड : कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी विविध पातळीवर उपाययोजना सुरु आहेत़ याचाच भाग संशयितांना होम क्वारंटाईन केले जात आहे़ शुक्रवारी नांदेड शहरात आणखी १० जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून, आता शहरात होम क्वारंटाईन केलेल्यांची संख्या ४ हजार २५ एवढी झाली आहे़  तर जिल्ह्यात ७ हजार ८४१ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे़ या सर्वांना १४ दिवस घरात थांबणे बंधनकारक आहे़
 

नांदेडच्या शेजारी असलेल्या हिंगोली जिल्ह्यातही कोरोनाबाधित रुग्ण निघाल्याने नांदेडमधील यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे़ घराबाहेर विनाकारण पडणा-यांना दंड ठोठावला जात आहे़ याबरोबरच शहराच्या विविध भागात बॅरीकेटस् लावून अकारण घराबाहेर पडणा-यांना चाप लावण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे़  दुसरीकडे, बाहेर जिल्ह्यातून आलेल्या तसेच कोरोनाची प्राथमिक लक्षणे असलेल्या सर्दी, तापाच्या रुग्णांनाही होम क्वारंटाईन करण्यात येत आहे़ नांदेड जिल्ह्यात अशा ७ हजार ८४१ जणांच्या हातावर शिक्के मारुन घरामध्येच राहण्यास सांगण्यात आले आहे़


ग्रामीण भागाचा विचार करता शुक्रवारी आणखी ६२ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले़ यामध्ये मुखेड येथे सर्वाधिक १३, भोकर १२, हदगाव ७, कंधार ९, देगलूर, धर्माबाद प्रत्येकी ३, लोहा, उमरी प्रत्येकी ६ तर कुंडलवाडी येथे २ आणि अर्धापूर येथे १ जणाच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला़
 

जिल्ह्यातील नगरपालिकानिहाय आकडेवारीचा विचार केला असता, सर्वाधिक ६३९ जण कंधार येथे होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत़ तर कुंडलवाडी १७२, किनवट १७५, देगलूर २३२, धर्माबाद १४२, बिलोली ८६, लोहा २८९, उमरी १४२, हदगाव २४८, भोकर ४७९, मुखेड २७२, मुदखेड १५७, अर्धापूर ३१०, माहूर ९६, हिमायतनगर १६५ तर नायगाव नगरपालिके     अंतर्गत २१० जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे़ नांदेड महानगरपालिकेअंतर्गत कालपर्यंत ४ हजार १५ जण होम क्वारंटाईन होते़ यामध्ये आणखी १० जणांची भर पडली असून आता ही संख्या ४ हजार २५ एवढी झाली आहे़ या सर्वांना दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत़

 

बाहेरगावाहून येणा-यांचा ओघ सुरुच
च्कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने घराघरांत जावून सर्वेक्षण करण्यात येत आहे़ शुक्रवारी जिल्ह्यात बाहेरगावाहून आलेल्यांची संख्या पुन्हा १६०५ ने वाढल्याचे या सर्वेक्षणातून पुढे आले असून, आता जिल्ह्यात ४९ हजार १२६ नागरिक हे बाहेर गावाहून जिल्ह्यात परतल्याचे स्पष्ट झाले आहे़ यामध्ये अर्धापूर २,१६८, भोकर १,९६०, बिलोली ४००५, देगलूर ६,२६५, धर्माबाद १३६१, हदगाव ३८५२, हिमायतनगर १७२२, कंधार ८८४३, किनवट २२९९, लोहा ४५५८, माहूर ३१२८, मुदखेड १५०३, मुखेड ८२५२, नायगाव ५६९४, नांदेड २२३०, उमरी १७१८ आणि इतर ठिकाणी ३९६६ जण बाहेर गावाहून परतलेले आहेत़
 

१५ जण डॉक्टरांच्या निगराणीखाली
च्बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांचा घरोघरी जावून सर्व्हे करण्यात येत आहे़ यात पुण्या, मुंबईहून आलेल्यांच्या हातावर शिक्के मारुन त्यांचे घरामध्येच विलगीकरण करण्यास सांगण्यात आले आहे़ याबरोबरच कोरोनाची तापासह इतर लक्षणे असणा-यांनाही दक्षता घेण्याच्या हेतूने क्वारंटाईन करण्यात येत आहे़ तर कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने संशयितांना रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे़ जिल्ह्यात अशा १५ आयसोलेशन केसेस आहेत़ यामध्ये देगलूर येथे ३, मुखेड ४, माहूर ६ आणि नायगाव येथे दोघांना आयसोलेट करण्यात आले आहे़ नांदेडसह मुखेड येथे खास कोरोनासाठी रुग्णालय असणार आहे़ येथेही पुरेशा सुविधा देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत़

Web Title: CoronaVirus: 7841 Home quarantine stamps held in Nanded district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.