नव्या वर्षात वेळेत धान्य उचल करण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:12 IST2021-01-01T04:12:50+5:302021-01-01T04:12:50+5:30

ही परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी भारतीय अन्न महामंडळास पत्र लिहून एकाच गोदामातून धान्याची उचल करण्याचे ...

The challenge of picking grain on time in the new year | नव्या वर्षात वेळेत धान्य उचल करण्याचे आव्हान

नव्या वर्षात वेळेत धान्य उचल करण्याचे आव्हान

ही परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी भारतीय अन्न महामंडळास पत्र लिहून एकाच गोदामातून धान्याची उचल करण्याचे निर्देश दिल्यास अथवा अपरिहार्य परिस्थितीत जवळच्या डेपोतून नियतन उपलब्ध करून देण्यास भारतीय अन्न महामंडळाने असमर्थता दर्शविल्यास पर्यायी डेपोतून वाहतूक करावी लागल्यास वाहतुकीच्या अंतरामध्ये जितक्या अधिक टक्क्याने वाढ झाली, त्या अंतराच्या वाढीव पटीने अतिरिक्त खर्चाची जबाबदारी भारतीय अन्न महामंडळाची राहील, अशी तरतूद असल्याचे स्पष्ट केेले आहे. त्याचवेळी जिल्ह्यातील धान्याची उचल पूर्णपणे व सुरळीतपणे होण्यासाठी तसेच जिल्ह्यातील लाभार्थींना धान्य मुदतीत पोहोचविण्यासाठी केंद्रीय वखार महामंडळासह महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ या दोन्ही गोदामांतून धान्य उचल करण्याबाबतचे निर्देश देण्याबाबत कळविले आहे.

चौकट -

तुप्पा येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात धान्य न साठवण्याचा निर्णय अचानक भारतीय अन्न महामंडळाने घेतला आहे. या निर्णयाचा फटका जिल्ह्यातील अन्नधान्य वाहतुकीला बसला आहे. जानेवारी महिन्यात लाभार्थींना धान्य उपलब्ध होईल की नाही, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यात गेल्या १५ वर्षांपासून सुरू असलेले केंद्रीय धान्य वखार महामंडळाचे गोदाम बंद करण्याचा निर्णय कोणत्या दबावापोटी घेतला गेला, याची चर्चाही सुरू झाली आहे. जालन्यातील धान्य वाहतूक ठेक्याचा नांदेड येथील केंद्रीय वखार महामंडळाचे गोदाम बंद करण्याशी संबंध जोडला जात आहे. गोदाम बंद होणार असल्याने काम करणाऱ्या २०० हून अधिक हमालांच्या रोजगाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: The challenge of picking grain on time in the new year