पाकिस्तानी गँगस्टर प्रकरणी नांदेडातून एटीएसने दोघांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 21:55 IST2026-05-13T21:55:05+5:302026-05-13T21:55:54+5:30

एटीएसकडून दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली आहे.

ats arrests two from Nanded in Pakistani gangster case | पाकिस्तानी गँगस्टर प्रकरणी नांदेडातून एटीएसने दोघांना घेतले ताब्यात

पाकिस्तानी गँगस्टर प्रकरणी नांदेडातून एटीएसने दोघांना घेतले ताब्यात

नांदेड: पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी विरोधात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई सुरू केली आहे. या अनुषंगाने नांदेडातहीएटीएसकडून दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली आहे.

दहशतवादी भरती आणि हेरगिरीशी संबंधित प्रकरणांमध्ये शहजाद भट्टीचे नाव समोर आले आहे. त्याचबरोबर सोशल मिडियाच्या माध्यमातून तो तरुणांना जाळ्यात ओढत आहे. त्यामुळे केंद्रीय आणि राज्य सुरक्षा यंत्रणांनी त्याच्या हालचालीवर लक्ष केंद्रीत केले असून बुधवारी राज्यभरात धाडी टाकून शहजाद भट्टी किंवा त्याच्या डोगर गँगशी संपर्कात असलेल्या ५७ व्यक्तींची माहिती गोळा केली जात आहे.

त्याच अनुषंगाने नांदेड शहरातील देगलूरनाका आणि इतवारा भागात राहणाऱ्या दोन तरुणांना त्यांच्या घरुन ताब्यात घेतले. त्यानंतर चौकशी करुन काही न आढळल्याने त्यांना सोडून देण्यात आले.

Web Title : पाकिस्तानी गैंगस्टर मामले में नांदेड़ से एटीएस ने दो को हिरासत में लिया

Web Summary : महाराष्ट्र एटीएस पाकिस्तानी गैंगस्टर शहजाद भट्टी की जांच कर रही है। नांदेड़ में दो युवकों को भट्टी से संदिग्ध संबंधों के आरोप में हिरासत में लेकर पूछताछ की गई, जो सोशल मीडिया के माध्यम से भर्ती करने के लिए जाना जाता है। पूछताछ के बाद कुछ भी संदिग्ध नहीं मिलने पर उन्हें रिहा कर दिया गया। महाराष्ट्र में भट्टी के नेटवर्क पर छापे मारे गए।

Web Title : ATS Detains Two in Nanded Regarding Pakistani Gangster Case

Web Summary : Maharashtra ATS is investigating Pakistani gangster Shahzad Bhatti. Two Nanded youths were detained and questioned regarding suspected links to Bhatti, known for recruiting via social media. After questioning and finding nothing suspicious, they were released. Raids across Maharashtra targeted Bhatti's network.