सभापतीपदासाठी आठ इच्छुकांनी नेले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:24 IST2020-12-30T04:24:21+5:302020-12-30T04:24:21+5:30

नांदेड : महापालिका स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणूक प्रक्रियेत मंगळवारी अर्ज वितरण करण्यात आले. काँग्रेसच्या आठ इच्छुकांनी या पदांसाठी ...

Applications taken by eight aspirants for the post of Speaker | सभापतीपदासाठी आठ इच्छुकांनी नेले अर्ज

सभापतीपदासाठी आठ इच्छुकांनी नेले अर्ज

नांदेड : महापालिका स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणूक प्रक्रियेत मंगळवारी अर्ज वितरण करण्यात आले. काँग्रेसच्या आठ इच्छुकांनी या पदांसाठी अर्ज घेतले आहेत.

स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेत ३१ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. ३० डिसेंबर हा उमेदवारी दाखल करण्याचा दिवस आहे. या पदासाठी मंगळवारी अर्ज देण्यात आले. या प्रक्रियेत काँग्रेसच्या आठ इच्छुकांसाठी सभागृह नेते वीरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी अर्ज घेतले. बुधवारी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी दाखल करता येणार आहे.

स्थायी समितीत काँग्रेसचे प्राबल्य पाहता काँग्रेसचाच सभापती होणार हे निश्चित आहे. काँग्रेसचे १५ तर भाजपाचा एकच सदस्य या समितीवर आहे. त्यामुळे अनुमोदकाअभावी भाजपाला अर्जही दाखल करता येणार नाही. परिणामी काँग्रेसकडून जो उमेदवार अर्ज दाखल करेल तोच सभापती ठरणार आहे. आतापर्यंत झालेल्या स्थायी समिती सभापतीच्या निवडणुका या बिनविरोधच झाल्या आहेत. त्यामुळे ही निवडणुकही बिनविरोधच होईल, हे स्पष्ट आहे. या पदावर काँग्रेसकडून कोणाला संधी मिळेल, याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Applications taken by eight aspirants for the post of Speaker