पल्स पोलिओ लसीकरणासाठी प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:18 IST2020-12-31T04:18:44+5:302020-12-31T04:18:44+5:30

या बैठकीत कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आवश्यक असणारी प्राथमिक तयारी पूर्ण झाली असून ही मोहीम यशस्वी करु असा निर्धार ...

Administration ready for pulse polio vaccination | पल्स पोलिओ लसीकरणासाठी प्रशासन सज्ज

पल्स पोलिओ लसीकरणासाठी प्रशासन सज्ज

या बैठकीत कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आवश्यक असणारी प्राथमिक तयारी पूर्ण झाली असून ही मोहीम यशस्वी करु असा निर्धार जिल्हा प्रशासनातर्फे व्यक्त केला. या समन्वय समितीच्या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) एस. व्ही. शिंगणे, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. विद्या झिने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे डॉ. संतोष शिरसीकर यांची उपस्थिती होती.

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १७ जानेवारी २०२१ रोजी राबविल्या जाणाऱ्या लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. या मोहिमेत बायव्हायलंट पोलिओ लसीचा वापर करण्यात येईल. मे २०१६ पासून नियमित लसीकरणांतर्गत शून्य ते १ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओची इंजेक्शन माध्यमातून आयपीव्ही लस देण्यात येते. या मोहिमेत १७ जानेवारी रोजी बूथवर व त्यानंतर ग्रामीण भागात ३ दिवस व शहरी भागात ५ दिवस याप्रमाणे घर भेटीचेही नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण क्षेत्र व स्थलांतरित, भटकी लोकसंख्या व जोखीमग्रस्त कार्यक्षेत्रात लसीकरणांतर्गत विशेष लक्ष दिले जात आहे. यात अतिदुर्गम भाग, डोंगराळ भागातील पाडे, वस्त्या, शहरी भागातील झोपडपट्टी, विटभट्ट्या, बांधकामे, स्थलांतरित वस्त्या, ऊसतोड वस्त्या, सलग तीन सदरे रद्द झालेली गावे यावर भर दिला जात आहे. या भागातील एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य विभागाचा संक्षिप्त आढावा घेऊन आरोग्य विभागाला निर्देश दिले.

डबल बातमी --------------------------------------------------------------------

नांदेड : जिल्ह्यात १७ जानेवारी रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक घेण्यात आली.

या बैठकीत कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आवश्यक असणारी प्राथमिक तयारी पूर्ण झाली असून ही मोहीम यशस्वी करु असा निर्धार जिल्हा प्रशासनातर्फे व्यक्त केला. या समन्वय समितीच्या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) एस. व्ही. शिंगणे, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. विद्या झिने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे डॉ. संतोष शिरसीकर यांची उपस्थिती होती.

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १७ जानेवारी २०२१ रोजी राबविल्या जाणाऱ्या लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. या मोहिमेत बायव्हायलंट पोलिओ लसीचा वापर करण्यात येईल. मे २०१६ पासून नियमित लसीकरणांतर्गत शून्य ते १ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओची इंजेक्शन माध्यमातून आयपीव्ही लस देण्यात येते. या मोहिमेत १७ जानेवारी रोजी बूथवर व त्यानंतर ग्रामीण भागात ३ दिवस व शहरी भागात ५ दिवस याप्रमाणे घर भेटीचेही नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण क्षेत्र व स्थलांतरित, भटकी लोकसंख्या व जोखीमग्रस्त कार्यक्षेत्रात लसीकरणांतर्गत विशेष लक्ष दिले जात आहे. यात अतिदुर्गम भाग, डोंगराळ भागातील पाडे, वस्त्या, शहरी भागातील झोपडपट्टी, विटभट्ट्या, बांधकामे, स्थलांतरित वस्त्या, ऊसतोड वस्त्या, सलग तीन सदरे रद्द झालेली गावे यावर भर दिला जात आहे. या भागातील एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य विभागाचा संक्षिप्त आढावा घेऊन आरोग्य विभागाला निर्देश दिले.

Web Title: Administration ready for pulse polio vaccination