शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

कंधार तालुक्यातील ५४ मतदान केंद्रे संवेदनशील :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:23 IST

कंधार : तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतींमधील ८४१ सदस्यपदांसाठी गावपुढाऱ्यांना नामनिर्देशनपत्रे दाखल करताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच १२ ...

कंधार : तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतींमधील ८४१ सदस्यपदांसाठी गावपुढाऱ्यांना नामनिर्देशनपत्रे दाखल करताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच १२ गावांतील ५४ मतदान केंद्रे संवेदनशील असल्याचे समोर आले आहे. त्यात दिग्गज पुढाऱ्यांच्या गावांचा समावेश असल्याने मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त अधिक राहणार असल्याचे समजते.

तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत गावपुढाऱ्यांचा राजकीय कस लागणार आहे. गावाची सत्ता ताब्यात घेण्यासाठी मोठी राजकीय व्यूहरचना करीत असताना मागील निवडणुकीत विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर न केल्याने १२४ जणांना अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे यावेळी उमेदवारी निश्चित करून पॅनल सक्षम करण्यात अडथळा आला. अचानक नवीन उमेदवारांची शोधाशोध करावी लागली. कागदपत्रे जमवाजमव करताना दमछाक सुरू झाली. पुन्हा शांततेत निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी चालविली आहे. तालुक्यात निवडणूक होत असलेल्या ९७ ग्रामपंचायत गावांत ३२८ मतदान केंद्रे आहेत. त्यात कुरुळा गावातील ९ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. शिराढोण- ९, हाळदा- ५, काटकंळबा- ४, पानभोसी- ४, फुलवळ- ४, चिखली- ४, नंदनवन- ३, धानोराकौठा- ३, मरशिवणी- ३, वहाद- ३, गोणार- ३, अशी १२ गावांतील ५४ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. त्यामुळे प्रशासन व पोलिसांची या केंद्रावर करडी नजर राहणार आहे. संवेदनशील मतदान केंद्रे असलेल्या गावांत खा. प्रताप पा. चिखलीकर, आ. श्यामसुंदर शिंदे, माजी आ. ईश्वरराव भोसीकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे आदी दिग्गज पुढाऱ्यांच्या गावांचा समावेश आहे.

९७ ग्रामपंचायतींमध्ये १ लाख ५२ हजार मतदार

जानेवारी महिन्यात होणाऱ्या ९७ ग्रा.पं. निवडणुकीत एकूण १ लाख ५२ हजार ७६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. त्यात पुरुष ७९ हजार ९४७, महिला ७२ हजार ७२ व इतर ७ मतदारांचा समावेश आहे. प्रत्येक मतदारास प्रत्यक्ष भेटून आपली भूमिका सांगताना उमेदवाराची मोठी कसरत होणार, असेच संकेत आहेत.