शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

भोकर तालुक्यात ३५२ नामनिर्देशनपत्रे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:24 IST

भोकर : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने सदस्यपदासाठी इच्छुक ३५२ जणांनी मंगळवारी नामनिर्देशनपत्र दाखल केल्यानंतर आतापर्यंत एकूण ४३० अर्ज प्राप्त ...

भोकर : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने सदस्यपदासाठी इच्छुक ३५२ जणांनी मंगळवारी नामनिर्देशनपत्र दाखल केल्यानंतर आतापर्यंत एकूण ४३० अर्ज प्राप्त झाल्याची माहिती तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी दिली आहे.

तालुक्यातील विविध ६३ ग्रामपंचायतींतर्गत १९३ वाॅर्डांत ५१३ सदस्यपदासाठी निवडणुका होत आहेत. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करावयाच्या सातव्या दिवशी तब्बल ३५२ जणांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. यापूर्वी ७८ जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे आतापर्यंत एकूण ४३० नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. विशेष म्हणजे तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींपैकी फक्त ४५ ग्रामपंचायतींचेच अर्ज प्राप्त झाले आहेत. यात तालुक्यातील किनी ग्रामपंचायतीतून सर्वाधिक २८ अर्ज दाखल झाले, तर तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींमधून अद्यापपर्यंत एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही.

नामनिर्देशनपत्र सादर करण्यासाठी तहसील कार्यालयात २२ टेबल लावण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करण्यापूर्वी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या किचकट प्रक्रियेतून जावे लागले. त्यातच ऑनलाइन अर्जासाठी दिलेल्या

गती दिवसभर संथगतीने चालल्यामुळे ठिकठिकाणी गर्दी झाली होती. त्यातच आयोगाच्या नवीन आदेशानुसार अर्ज दाखल करावयाच्या शेवटच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने ऑफलाइन अर्ज दाखल करण्याबरोबरच सायंकाळी ५.३० वाजेपर्यंतची वेळ वाढवून दिल्याने इच्छुकांना दिलासा मिळाला आहे.