शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक जलकुंभांतर्गत २० ठिकाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:23 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क नांदेड : महापालिकेच्यावतीने शहराला करण्यात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता तपासणी ही जिल्हा प्रयोग शाळेत केली जाते. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

नांदेड : महापालिकेच्यावतीने शहराला करण्यात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता तपासणी ही जिल्हा प्रयोग शाळेत केली जाते. पाणी सोडण्यापूर्वी प्रत्येक वॉलमनला जलकुंभावर टेस्ट करुनच पाणी सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचवेळी त्या जलकुंभाहून पाणीपुरवठा होणाऱ्या भागात २० ठिकाणी पाण्याची तपासणी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी २००८ मध्ये पाणीपुरवठा यंत्रणेचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. ३८ जलकुंभावरुन जवळपास ८ लाख लोकसंख्येच्या शहराला पाणीपुरवठा केला जातो. सद्य:स्थितीत दोन दिवसाला पाणीपुरवठा केला जात आहे. तीन जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी शुद्ध करुन पाणीपुरवठा केला जातो. जिल्हा प्रयोग शाळेत पाणी तपासणीचे अहवाल तपासल्यानंतर हे अहवाल औरंगाबादच्या विभागीय कार्यालयातही पाठविले जातात. एखाद्या भागात दुषित पाणीपुरवठा आढळल्यास त्या भागात पाणी गळती कुठे सुरू आहे का? याबाबत माहिती घेवून तात्काळ दुरुस्ती केली जाते.

शहरात प्रति व्यक्ती १३५ लिटर पाणीपुरवठा केला जातो. पाण्याची गुणवत्ता याबाबत महापालिका दक्ष आहे. शहरात होणारी गळती रोखण्यासाठी महापालिकेने पाणी पुरवठा विभागाकडून वेळोवेळी कामे हाती घेण्यात येतात. पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी सांगितले.लाेकमत न्यूज नेटवर्क

नांदेड : महापालिकेच्यावतीने शहराला करण्यात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ता तपासणी ही जिल्हा प्रयोग शाळेत केली जाते. पाणी सोडण्यापूर्वी प्रत्येक वॉलमनला जलकुंभावर टेस्ट करुनच पाणी सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचवेळी त्या जलकुंभाहून पाणीपुरवठा होणाऱ्या भागात २० ठिकाणी पाण्याची तपासणी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी २००८ मध्ये पाणीपुरवठा यंत्रणेचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. ३८ जलकुंभावरुन जवळपास ८ लाख लोकसंख्येच्या शहराला पाणीपुरवठा केला जातो. सद्य:स्थितीत दोन दिवसाला पाणीपुरवठा केला जात आहे. तीन जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी शुद्ध करुन पाणीपुरवठा केला जातो. जिल्हा प्रयोग शाळेत पाणी तपासणीचे अहवाल तपासल्यानंतर हे अहवाल औरंगाबादच्या विभागीय कार्यालयातही पाठविले जातात. एखाद्या भागात दुषित पाणीपुरवठा आढळल्यास त्या भागात पाणी गळती कुठे सुरू आहे का? याबाबत माहिती घेवून तात्काळ दुरुस्ती केली जाते.

शहरात प्रति व्यक्ती १३५ लिटर पाणीपुरवठा केला जातो. पाण्याची गुणवत्ता याबाबत महापालिका दक्ष आहे. शहरात होणारी गळती रोखण्यासाठी महापालिकेने पाणी पुरवठा विभागाकडून वेळोवेळी कामे हाती घेण्यात येतात. पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी सांगितले.

जलकुंभातून होणाऱ्या २० ठिकाणची तपासणी

शहरात एकूण ३८ जलकुंभ आहेत. या जलकुंभावरुन नांदेड उत्तर तसेच नांदेड दक्षिण भागात पाणीपुरवठा केला जातो. प्रत्येक जलकुंभावर पाणीपुरवठा करण्यापूर्वी वॉलमनकडून ओटी टेस्ट घेतली जाते. त्याचवेळी प्रभागात नेमलेल्या कर्मचाऱ्याकडून एका जलकुंभाच्या परिसरातील २० ठिकाणचे पाणी नमुने घेवून ते तपासणीसाठी पाठविली जातात. या कामासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.जलकुंभातून होणाऱ्या २० ठिकाणची तपासणी

शहरात एकूण ३८ जलकुंभ आहेत. या जलकुंभावरुन नांदेड उत्तर तसेच नांदेड दक्षिण भागात पाणीपुरवठा केला जातो. प्रत्येक जलकुंभावर पाणीपुरवठा करण्यापूर्वी वॉलमनकडून ओटी टेस्ट घेतली जाते. त्याचवेळी प्रभागात नेमलेल्या कर्मचाऱ्याकडून एका जलकुंभाच्या परिसरातील २० ठिकाणचे पाणी नमुने घेवून ते तपासणीसाठी पाठविली जातात. या कामासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रयोग शाळेत तपासणी

n शहरात होणाऱ्या पाणी पुरवठ्याची गुणवत्ता तपासणीसाठी जिल्हा प्रयोग शाळेत पाणी नमुने पाठविले जातात. हे नमुने दर दोन दिवसाला घेतले जातात. शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो.

n शहरातील ३८ जलकुंभांतर्गत ज्या ज्या भागाला पाणीपुरवठा होतो त्या प्रत्येक भागात २० ठिकाणचे पाणी नमुने मनपा कर्मचारी घेतात. जिल्हा प्रयोग शाळेत पाणी तपासल्यानंतर त्याचे अहवाल मनपालाही सादर केले जातात.प्रयोग शाळेत तपासणी

n शहरात होणाऱ्या पाणी पुरवठ्याची गुणवत्ता तपासणीसाठी जिल्हा प्रयोग शाळेत पाणी नमुने पाठविले जातात. हे नमुने दर दोन दिवसाला घेतले जातात. शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो.

n शहरातील ३८ जलकुंभांतर्गत ज्या ज्या भागाला पाणीपुरवठा होतो त्या प्रत्येक भागात २० ठिकाणचे पाणी नमुने मनपा कर्मचारी घेतात. जिल्हा प्रयोग शाळेत पाणी तपासल्यानंतर त्याचे अहवाल मनपालाही सादर केले जातात.

शहरात शुद्ध पाणीपुरवठा करणे, नागरिकांचे आरोग्य सांभाळणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. यासाठी पाणीपुरवठा व आरोग्य विभागाला खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. एखाद्या भागात दुषित पाणीपुरवठा होत असल्यास तात्काळ उपाययोजना केल्या जातात.

- डॉ. सुनील लहाने, आयुक्त, महापालिकाशहरात शुद्ध पाणीपुरवठा करणे, नागरिकांचे आरोग्य सांभाळणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. यासाठी पाणीपुरवठा व आरोग्य विभागाला खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. एखाद्या भागात दुषित पाणीपुरवठा होत असल्यास तात्काळ उपाययोजना केल्या जातात.

- डॉ. सुनील लहाने, आयुक्त, महापालिका