शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाची निर्घृण हत्या

By admin | Updated: May 18, 2016 03:08 IST

सक्करदरा परिसरात मंगळवारी दिवसाढवळ्या अनिकेत विजयराव हिंगणीकर (वय २८, रा. संजय गांधीनगर) या तरुणाची निर्घृण हत्या झाली.

सक्करदऱ्यात थरार : आरोपी गजाआडनागपूर : सक्करदरा परिसरात मंगळवारी दिवसाढवळ्या अनिकेत विजयराव हिंगणीकर (वय २८, रा. संजय गांधीनगर) या तरुणाची निर्घृण हत्या झाली. सोबत राहणाऱ्या आकाश खडतकर आणि रोहित ऊर्फ गोलू निमजे या दोघांनी अनिकेतची हत्या केली असून, पोलिसांनी काही तासातच त्यांच्या मुसक्या बांधल्या. अनिकेत, आकाश आणि गोलू हे तिघेही मित्र होते. मात्र काही दिवसांपासून त्यांच्यात वाद होता. आज दुपारी ४ च्या सुमारास ते गोकुल बारमध्ये दारू पीत बसले होते. तेथे क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यामुळे ते बारमधून उठून भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर आले. तेथे आकाश आणि गोलूने तीक्ष्ण शस्त्राचे वार करून अनिकेतची हत्या केली. अनेकांसमोर झालेल्या या थरारक हत्याकांडाने परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. माहिती कळताच सक्करदऱ्याचा पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला. अनिकेतची ओळख पटताच त्याच्या नातेवाईकांना कळविण्यात आले. त्याची बहीण कांचन आणि त्यानंतर अन्य नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. दोन महिन्यांपूर्वीच प्रेमविवाहअनिकेतचे वडील विजयराव कॅटरिंगचे काम करतात. तो त्यांना मदत करायचा, तसेच स्वत: कार वॉशिंग करायचा. १५ मार्चला त्याने पूनम नामक तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता. पूनमच्या घरच्यांचा त्याला विरोध होता. त्यामुळे अनिकेतची हत्या त्याच कारणावरून झाली असावी, असा संशय घेत पोलिसांनी चौकशी सुरू केली. मात्र, अनिकेतसोबत राहणारे त्याचे मित्र आकाश आणि गोलूसोबत त्याचा काही दिवसांपासून वाद असल्याचे तसेच त्यांनीच अनिकेतला मोबाईल करून बोलवून घेतल्याचे स्पष्ट होताच, पोलिसांनी त्या दोघांच्या मुसक्या बांधल्या. त्यांनी अनिकेतची हत्या केल्याचे कबूल केले.(प्रतिनिधी)आई आणि पत्नी बेशुद्ध सर्वात आधी घटनास्थळी अनिकेतची बहीण कांचन पोहोचली. भावाची हत्या झाल्याचे कळाल्याने ती आक्रोश करू लागली. मात्र, अशाही स्थितीत तिने आपल्या आईला आणि अनिकेतच्या पत्नीला हे वृत्त सांगितले नाही. सोबतच्या नातेवाईकांनाही ती आई आणि वहिनीला काही सांगू नका, असे म्हणत आपले हुंदके रोखत होती. यावेळी तिच्या मोबाईलवर घरच्यांचे सारखे फोन येत होते. काय झाले, अशी विचारणा होत होती. शेवटी घरच्यांसोबत आई आणि पूनमलाही अनिकेतची हत्या झाल्याचे कळले. ते ऐकून त्यांना जबर मानसिक धक्का बसला. त्या बेशुद्ध पडल्या.