शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Nagpur; विदर्भातील तरुण सर्वाधिक कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 12:00 IST

कोरोना विषाणूचा सर्वाधिक धोका वृद्धांना असल्याचे तज्ज्ञाकडून सांगण्यात येत असले तरी आतापर्यंत विदर्भात आढळून आलेल्या २८ कोरोनाबाधितांपैकी केवळ तीनच रुग्ण ६० वर्षांवरील आढळून आले आहेत. सर्वाधिक रुग्ण तरुण गटातील आहेत.

सुमेध वाघमारेनागपूर : कोरोना विषाणूचा सर्वाधिक धोका वृद्धांना असल्याचे तज्ज्ञाकडून सांगण्यात येत असले तरी आतापर्यंत विदर्भात आढळून आलेल्या २८ कोरोनाबाधितांपैकी केवळ तीनच रुग्ण ६० वर्षांवरील आढळून आले आहेत. सर्वाधिक रुग्ण तरुण गटातील आहेत. यांची संख्या २० आहे, तर लहान मुलांमधील रुग्णांची संख्या पाच आहे.राज्यात मुंबई, पुणे, सांगली व ठाण्यात ज्या गतीने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्या तुलनेत विदर्भात फार कमी आहेत. विदर्भात पुढील १४ दिवस एकही रुग्ण आढळून आला नाही तर आपण या संकटातून बाहेर पडू, असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे. कोरोना विषाणूची लागण झालेला पहिला रुग्ण नागपुरात ११ मार्च रोजी आढळून आला. तेव्हापासून ते ४ एप्रिलपर्यंत नागपुरात १७ रुग्ण आढळून आले आहेत. यात ३० ते ५० वर्षे वयोगटातील १३ तर ६० वर्षांवरील एक तर ११ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये तीन रुग्ण आहेत. नागपूरशिवाय विदर्भात केवळ बुलडाणा, अमरावती, वाशिम व गोंदिया या चारच जिल्ह्यात ११ रुग्ण आढळून आले आहेत. नागपूरनंतर सर्वाधिक रुग्णांची नोंद बुलडाणा जिल्ह्यात झाली आहे. येथे आतापर्यंत आठ रुग्ण आढळून आले असून एका ४६ वर्षीय रुग्णाचा मृत्यूची नोंद आहे. गोंदिया, वाशिम व अमरावती जिल्ह्यात एक-एक रुग्ण आढळून आले आहेत. यात वाशिम जिल्ह्यात ६० वर्षे वयोगटातील एक तर अमरावती जिल्ह्यात ५० वर्षे वयोटातील रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या दोघांचे नमुने मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आले आहेत. एकूणच विदर्भात कोरोना रुग्णाची वयोगटानुसार स्थिती पाहता आतापर्यंत एक ते १७ वर्षे वयोगटात पाच, १८ ते ३० वर्षे वयोगटात एक, ३० ते ५० वर्षे वयोगटात १९ तर ६० वर्षांवरील वयोगटात तीन रुग्ण आढळून आले आहेत.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस