शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

’स्मार्ट नाकाबंदी अ‍ॅप’मध्ये तुमच्या वाहनाची कुंडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:20 IST

जगदीश जोशी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वाहतूक पोलिसांनी दिलेले चालान भरल्याशिवाय आता पर्याय नाही. कारण वाहतूक शाखेच्या ...

जगदीश जोशी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वाहतूक पोलिसांनी दिलेले चालान भरल्याशिवाय आता पर्याय नाही. कारण वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता ‘स्मार्ट नाकाबंदी’ अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याद्वारे बारकोडसारखा कुठल्याही वाहनाचा नंबर स्कॅन केला की थकीत चालानची संपूर्ण माहिती समोर येईल. तीन अथवा त्याहून अधिक चालान थकीत आढळल्यास वाहतूक पोलीस ते वाहन ताब्यात घेतील. बुधवारपासून नागपुरात वाहतूक पोलिसांचे ‘स्मार्ट नाकाबंदी’ अ‍ॅप चालान न भरलेल्या वाहनांचा शोध घेणार आहे.

वाहतूक पोलीस चालान डिव्हाईस (उपकरण) सोबतच शहरात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून ई-चालान करते. दररोज शेकडोच्या संख्येने ई-चालान केले जाते. अनेक वाहन चालकांना मोबाईलवर ई-चालानच्या सूचना दिली जाते. गेल्या दोन वर्षात वाहतूक शाखेने ३५ कोटी रुपये ई-चालान केले आहे. यातील १९ कोटी लोकांनी दंड भरला आहे. परंतु ४४ टक्के म्हणजेच १६ कोटी चे ई-चालान वाहन चालकांवर थकीत आहे. याच्या वसुलीसाठी वाहतूक शाखेने वेळोवेळी विशेष मोहीम राबविली. त्यानंतरही वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. थकीत ई-चालानची माहिती मिळविण्यासाठी स्मार्ट नाकाबंदी अ‍ॅप लाँच करण्यात आले आहे. हे अ‍ॅप वाहतूक शाखेतील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर राहणार आहे. त्यांना स्वतंत्र आयडी दिली जाणार आहे. त्या माध्यमातून ते अ‍ॅपचा वापर करून ई-चालानसोबत दंड सुद्धा वसुल करू शकतात.

थकीत चालानची अशी मिळेल माहिती

स्मार्ट नाकाबंदी अ‍ॅपमध्ये थकित ई-चालान माहिती मिळविणे अतिशय सोपे आहे. अ‍ॅपवर वाहनाची नंबर प्लेट स्कॅन करताच, अथवा नंबर टाकताच वाहनाचे थकीत ई-चालानची माहिती पुढे येईल. संबंधित वाहन चालकावर तीन अथवा त्याहून अधिक चालान थकीत असल्याचे आढळल्यास दंड भरायला सांगण्यात येईल. जर तो दंड भरण्यास नकार देत असेल तर जागीच त्याचे वाहन ताब्यात घेण्यात येईल.

कारवाईतून पळ काढणे कठीण

या अ‍ॅपच्या माध्यमातून वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी एकमेकांशी जुळलेले राहील. वाहतूक कर्मचाऱ्याने केलेल्या कारवाईची संपूर्ण माहिती तो अधिकारी अथवा त्याच्या सहकाऱ्याला पाठवू शकतो. त्यामुळे कारवाईला टाळून पळ काढणाऱ्या वाहन चालकांनाही तात्काळ पकडणे सोपे जाईल.

दंड भरल्याशिवाय पर्याय नाही

१६ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी वाहतूक शाखेने कंबर कसली आहे. चौकाबरोबरच मॉल, मोठे पार्किंग प्लाझा येथे मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे थकीत दंड भरल्याशिवाय चालकाना पर्याय नाही. वाहन चालकांवर दोन वर्षाचे १६ कोटी रुपयांचे ई-चालान थकीत आहे. नागरिकांना वेळोवेळी चालान भरण्याचे आवाहन केले आहे. वसुलीसाठी मोहीमसुद्धा राबविण्यात आली होती. लोकांनी चालान भरण्यास प्रतिसाद दिला नाही. आता वाहन स्मार्ट नाकाबंदीत अडकल्याद चालकाला दंड भरल्याशिवाय पर्याय नाही. राज्यात नागपूर व ठाण्यात ही मोहीम राबविण्यात येत आहे.

सारंग आव्हाड, डीसीपी, वाहतूक शाखा