लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका तरुणाने प्रेयसीला व्हिडीओ कॉल केल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. आयुष अमर वामन (स्वीपर कॉलनी) असे मृताचे नाव आहे.
तो नागपूर रेल्वे स्थानकावर हाऊसकिपिंगचे काम करायचा. त्याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. त्यामुळे आयुष तणावात होता. त्याने सोमवारी सकाळी त्याच्या प्रेयसीला व्हिडीओ कॉल केला व तिच्यासमोरच स्कार्फपासून फास तयार केला. त्यानंतर त्याने मी गळफास घेत आहे, असे सांगितले. तरुणीने त्याला या विचारापासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला मात्र त्याने फॅनला गळफास घेत टोकाचे पाऊल उचलले.
आत्महत्येअगोदर त्याने मोबाइलमधून चॅट्स डिलिट केले होते. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत त्याचा फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविला आहे. त्याने कुठलीही सुसाइड नोट न सोडल्याने आत्महत्येचे नेमके कारण समोर येऊ शकलेले नाही. पोलिस त्याच्या निकटवर्तीयांशी बोलून कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
Web Summary : Nagpur: A young man committed suicide by hanging himself during a video call with his girlfriend after an argument. He used a scarf. Police are investigating the reason, as no suicide note was found. The phone is sent for forensic analysis.
Web Summary : नागपुर: एक युवक ने अपनी प्रेमिका को वीडियो कॉल पर फांसी लगाकर आत्महत्या कर ली। बहस के बाद उसने स्कार्फ का इस्तेमाल किया। पुलिस कारण की जांच कर रही है, क्योंकि कोई सुसाइड नोट नहीं मिला। फोन को फोरेंसिक विश्लेषण के लिए भेजा गया है।