शनिवार १६ मे रोजी असणाऱ्या शनी जयंती(Shani Jayanti 2026) निमित्त शनी देवांची कृपा संपादन करण्यासाठी आणि साडेसाती किंवा ढैयाचा त्रास कमी करण्यासाठी अनेक आध्यात्मिक उपाय सांगितले जातात. त्यापैकी 'पिंपळाच्या झाडाखालील दिवा' आणि 'छायादान' हे दोन अत्यंत प्रभावी मार्ग मानले जातात. यंदा वैशाख अमावस्या(Vaishakh Amavasya 2026) ही तिथी शनिवारी आल्यामुळे ती शनी अमावस्या(Shani Amavasya 2026) देखील म्हटली जाईल आणि या दिवसाचे महत्त्व अधिक वाढेल.
हे ही वाचा : शनी जयंती २०२६: कर्माचा हिशोब अन् धनाची आवक; 'या' राशींसाठी १६ मे ठरणार गेम-चेंजर!
शनी देव हे कर्माचे फळ देणारे दैवत आहेत. त्यांची कृपा मिळवण्यासाठी केवळ कष्ट असून चालत नाही, तर त्याला शास्त्रोक्त उपायांची जोड देणेही आवश्यक असते. शनी जयंतीच्या शुभ मुहूर्तावर जर तुम्ही खालील दोन सेवा केल्या, तर जीवनातील अनेक अडचणी दूर होऊ शकतात.
१. पिंपळाच्या झाडाखाली कणकेचा दिवा
शास्त्रानुसार पिंपळाच्या झाडावर सर्व देवांचा वास असतो आणि शनी देवांना हे झाड अत्यंत प्रिय आहे.
काय करावे? शनी जयंतीच्या दिवशी सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली कणकेचा (गव्हाच्या पिठाचा) दिवा लावावा. या दिव्यात मोहरीचे तेल वापरावे.
फायदा: पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने पितृदोष आणि शनी दोषातून मुक्ती मिळते. कणकेचा दिवा हा अधिक सात्त्विक मानला जातो, ज्यामुळे घरामध्ये सुख-समृद्धी येते आणि रखडलेली कामे मार्गी लागतात. म्हणून दीप अमावास्येलाही कणकेचा दिवा लावला जातो.
हे ही वाचा : Adhik Maas 2026: अधिक मासात संकटमुक्तीसाठी करा 'ही' दत्तसेवा; मिळेल श्री दत्तगुरूंचा अखंड आशीर्वाद!
२. 'छायादान': शनी पीडा दूर करण्याचा उपाय
'छायादान' हे नाव जितके गूढ आहे, तितकाच त्याचा प्रभाव मोठा आहे. आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा किंवा ग्रहांची पीडा काढून टाकण्यासाठी हे दान केले जाते.
कसे करावे छायादान?
साहित्य: एक मातीचे छोटे भांडे (गाडगे) आणि स्वच्छ पाणी.
कृती: एका मातीच्या भांड्यात पूर्ण काठोकाठ पाणी भरा.
प्रतिबिंब: त्यानंतर त्या पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब (चेहरा) नीट पहा. पाण्यात स्वतःची प्रतिमा पाहताना मनातल्या मनात शनी देवांचे स्मरण करा आणि आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या चुकांची क्षमा मागा.
दान: प्रतिबिंब पाहून झाल्यानंतर ते पाण्याचे पात्र शांतपणे शनी मंदिरात नेऊन दान करा किंवा तिथे शनी देवाच्या चरणाजवळ ठेवा.
महत्त्व: शास्त्रानुसार, जेव्हा आपण पाण्यात आपली सावली किंवा प्रतिबिंब पाहतो, तेव्हा आपल्यातील इडा-पीडा किंवा नकारात्मक लहरी त्या पाण्यात उतरतात, असे मानले जाते. हे पात्र दान केल्याने व्यक्तीला शनीच्या प्रकोपापासून दिलासा मिळतो.
हे ही वाचा : Astro Tips: श्रीमंत होण्याचे प्रबळ योग! 'या' नक्षत्रात जन्मलेले लोक शून्यातून विश्व करतात विश्व निर्माण!
शुद्धता: हे उपाय करताना आपले मन आणि शरीर शुद्ध असावे.
मंत्र: दिवा लावताना 'ॐ शं शनैश्चराय नमः' या मंत्राचा १०८ वेळा जप करणे अधिक फलदायी ठरते.
इतरांची मदत: शक्य असल्यास शनी जयंतीच्या दिवशी गरजू व्यक्तीला काळे तीळ, छत्री किंवा चामड्याच्या चपला दान करा. शनी देव अशा सेवांनी लवकर प्रसन्न होतात.
Web Summary : Shani Jayanti 2026: Perform Peepal tree diya lighting and shadow offering for blessings. These remedies help reduce Shani's adverse effects. Offering water with self-reflection removes negative energy, bringing relief from hardships.
Web Summary : शनि जयंती 2026: शनिदेव की कृपा पाने के लिए पीपल के पेड़ के नीचे दीया जलाएं और छाया दान करें। ये उपाय शनि के प्रतिकूल प्रभावों को कम करते हैं। आत्म-चिंतन के साथ जल अर्पित करना नकारात्मक ऊर्जा को दूर करता है, जिससे कष्टों से मुक्ति मिलती है।