नवी दिल्ली : पश्चिम आशियातील युद्ध परिस्थिती, होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे देशातील महागाईचा दबाव आणखी तीव्र झाला आहे. एप्रिल २०२६ मध्ये घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर तब्बल ८.३ टक्क्यांवर पोहोचला असून, हा मागील ४२ महिन्यांतील उच्चांक ठरला आहे. मार्चमध्ये हा दर केवळ ३.८८% होता.
महागाई वाढण्याची कारणे
युद्धजन्य तणाव, होर्मुझ सामुद्रधुनीतील अडथळे, कच्च्या तेलाच्या किमती वाढ, वाहतूक व लॉजिस्टिक खर्च, धातू, वस्त्रोद्योगातील महाग उत्पादन, ऊर्जा खर्चाचा उद्योगांवर वाढता परिणाम.
पेट्रोल-डिझेल ३ रुपयांनी महागले
एप्रिलमध्ये पेट्रोलमधील महागाई दर तब्बल ३२.४० टक्के नोंदवला गेला. मार्चमध्ये तो केवळ २.५० टक्के होता. डिझेलमधील महागाई दरही २५.१९ टक्क्यांवर गेला. एलपीजीमधील महागाई १०.९२ टक्के राहिली.
तेल कंपन्यांवरील ताण वाढत असल्याने दरवाढ करण्यात आली आहे. शुक्रवारपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती प्रति लिटर ३ रुपयांनी वाढल्या आहेत.
Web Summary : Rising crude oil prices and geopolitical tensions fuel India's inflation, hitting an alarming 8.3% in April, a 42-month peak. Petrol and diesel prices jumped by ₹3 per liter, with petrol inflation at 32.40%. Increased transportation costs and energy expenses further burden industries.
Web Summary : कच्चे तेल की बढ़ती कीमतें और भू-राजनीतिक तनाव भारत में मुद्रास्फीति को बढ़ा रहे हैं, अप्रैल में यह 8.3% तक पहुंच गई, जो 42 महीनों में सबसे अधिक है। पेट्रोल और डीजल की कीमतें ₹3 प्रति लीटर तक बढ़ गईं, पेट्रोल मुद्रास्फीति 32.40% पर है। परिवहन लागत और ऊर्जा व्यय में वृद्धि से उद्योगों पर और बोझ बढ़ गया है।