शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
3
Top Marathi News LIVE Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यूएईमध्ये; इंधनाचे दर, तुटवडा यावरील चर्चा महत्त्वाची
4
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
5
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
6
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
7
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
8
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
9
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
10
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
11
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
12
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
13
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
14
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
16
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
17
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
18
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
19
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
20
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 09:57 IST

NEET UG 2026 Re-exam Date AnAnnounced: पेपर फुटीमुळे नीट यूजी परीक्षा रद्द करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सीबीआय करत असून, नव्याने परीक्षा घेतली जाणार आहे. एनटीएने परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली. 

NEET UG 2026 Re-exam Announced: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीट यूजी परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली आहे. २१ जून २०२६ रोजी नीट परीक्षा देशभरात घेतली जाणार आहे. यापूर्वी घेण्यात आलेली नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणामुळे रद्द करण्यात आली. दरम्यान, परीक्षा होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका फुटल्याने एकूण परीक्षा घेणाऱ्या एनटीए संस्थेच्या कामावरच शंका उपस्थित होत आहे. 

सोशल मीडिया हॅण्डलवरून एनटीएने तारीख जाहीर केली आहे. केंद्र सरकारच्या मंजुरीनुसार, नीट यूजी २०२६ परीक्षा पुन्हा घेण्यासाठी तारीख जाहीर करत आहोत. परीक्षा २१ जून २०२६ रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थी आणि उमेदवारांना विनंती आहे की, त्यांनी एनटीएच्या अधिकृत वेबसाईटवरच विश्वास ठेवावा. 

नीट प्रश्नपत्रिकेतील प्रश्न 'गेस पेपर'मध्ये जसेच्या तसे

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा राष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. या वर्षी तब्बल २३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. पण, ३ मे रोजी झालेली परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द करण्यात आली. नीट प्रश्नपत्रिकेतील प्रश्न गेस पेपर आणि इतर माध्यमांतून विद्यार्थ्यांना विकले गेल्याचे समोर आले. याबद्दलच्या तक्रारी वाढल्यानंतर याचा तपास केला गेला आणि पेपर फुटल्याचे तपासातून निष्पन्न झाले. 

मिळालेल्या माहितीनुसार, नीट यूजी २०२६ परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे संच महाराष्ट्रातील काही खासगी क्लासमध्ये मिळाले होते. एका खासगी क्लासने परीक्षेपूर्वी काही दिवस आधी विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा घेतली होती. त्यात प्रश्नपत्रिकेतील प्रश्न जसेच्या तसे होते. 

नव्याने विद्यार्थ्यांना अर्ज करावा लागेल का? 

विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. पूर्वीची नोंदणी आणि परीक्षा केंद्रांची निवड कायम ठेवली जाईल.

विद्यार्थ्यांना फी परत भरावी लागेल का? 

विद्यार्थ्यांकडून आकारण्यात आलेली परीक्षा फी परत केली जाणार असून, नव्या परीक्षेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. तेवढाच काय तो विद्यार्थ्यांना दिलासा असणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : NEET UG 2026 Re-Exam Date Announced After Paper Leak

Web Summary : NEET UG 2026 re-exam scheduled for June 21st after paper leak. Previous exam cancelled. Students need not re-apply. Fees will be refunded. Focus on official NTA updates.
टॅग्स :NEET Examनीट परीक्षाexamपरीक्षाEducationशिक्षणStudentविद्यार्थी