शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Top Marathi News LIVE Updates: 'निवडणुका संपताच वसुली सुरू झालीये', दरवाढ होताच विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले
3
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
4
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
5
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
6
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
7
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
8
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
9
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
10
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
11
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
12
पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
13
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
14
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
15
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
16
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
17
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
18
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
19
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
20
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 11:31 IST

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेला 'पतन होत असलेला देश' म्हटले. या विधानावर डोनाल्ड ट्रम्प यांनी सहमती दर्शवली.

जगातील दोन महासत्तांचे नेते जेव्हा आमनेसामने येतात, तेव्हा संपूर्ण जगाचे लक्ष त्यांच्याकडे लागलेले असते. सध्या बीजिंगमध्ये सुरू असलेल्या ऐतिहासिक शिखर परिषदेतही असेच काहीसे घडले. मात्र, यावेळी चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेबद्दल काढलेले उद्गार आणि त्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली अनपेक्षित संमती. "अमेरिका हा रसातळाला जाणारा देश आहे," अशा शब्दांत जिनपिंग यांनी अमेरिकेची कानउघडणी केली आणि विशेष म्हणजे ट्रम्प यांनीही यात त्यांचे १०० टक्के समर्थन केले आहे.

नेमकं काय घडलं बीजिंगमध्ये?

डोनाल्ड ट्रम्प सध्या चीनच्या दौऱ्यावर असून त्यांची शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा झाली. या भेटीदरम्यान जिनपिंग यांनी पाश्चिमात्य जगाचा प्रभाव कमी होत असल्याचे आणि अमेरिकेची शक्ती क्षीण होत असल्याचे संकेत दिले. जिनपिंग यांनी अमेरिकेला 'पतन होत असलेला देश' असे संबोधले. यावरून अमेरिकेत टीकेची झोड उठण्याची शक्यता असतानाच, ट्रम्प यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या विधानाचे वेगळ्या पद्धतीने समर्थन करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

'हो, जिनपिंग १०० टक्के बरोबर आहेत!'

आपल्या 'ट्रुथ सोशल' या व्यासपीठावर ट्रम्प यांनी एक लांबचक पोस्ट लिहित जिनपिंग यांच्या विधानाची बाजू सावरून धरली. ट्रम्प म्हणाले, "जेव्हा राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग अमेरिकेला पतन होत असलेला देश म्हणतात, तेव्हा त्यांचा रोख जो बायडेन आणि त्यांच्या प्रशासनाच्या गेल्या ४ वर्षांतील अपयशाकडे होता. त्या बाबतीत जिनपिंग १०० टक्के बरोबर आहेत. २ वर्षांपूर्वी आपला देश खरोखरच विनाशाच्या उंबरठ्यावर होता."

'थ्यूसीडाइड्स ट्रॅप'चा दिला इशारा

जिनपिंग यांनी चर्चेदरम्यान 'थ्यूसीडाइड्स ट्रॅप' या ऐतिहासिक सिद्धांताचा उल्लेख केला. जेव्हा एखादी उदयोन्मुख शक्ती प्रस्थापित महासत्तेला  आव्हान देते, तेव्हा त्यांच्यातील संघर्ष अटळ असतो. "जग आज एका नवीन वळणावर उभे आहे. चीन आणि अमेरिका मिळून या संघर्षातून बाहेर पडू शकतात का?" असा प्रश्न जिनपिंग यांनी उपस्थित करत मोठ्या देशांच्या संबंधांचा नवा पॅटर्न तयार करण्याची गरज व्यक्त केली.

बायडेन यांच्यावर निशाणा, स्वतःच्या कामगिरीचे गोडवे

आपल्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर जोरदार टीका केली. बायडेन यांच्या काळात अमेरिकेची नाचक्की झाल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, गेल्या १६ महिन्यांत आपल्या नेतृत्वाखाली अमेरिकेने पुन्हा उभारी घेतल्याचा दावाही त्यांनी केला. रेकॉर्डब्रेक शेअर बाजार, रोजगाराच्या संधी, वाढती लष्करी ताकद आणि जगात पुन्हा निर्माण झालेला अमेरिकेचा दबदबा यामुळे आता अमेरिका जगातील सर्वात वेगाने प्रगती करणारा देश बनल्याचे ट्रम्प यांनी आवर्जून सांगितले. शिखर परिषदेत जिनपिंग यांनी ट्रम्प प्रशासनाच्या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला आहे. तणाव असूनही वॉशिंग्टन आणि बीजिंगचे संबंध भविष्यात अधिक मजबूत होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Xi's 'America Declining' Remark Rattles; Trump Agrees, Blames Biden

Web Summary : Xi Jinping stated America is declining, a claim Trump surprisingly supported, blaming Biden's administration. Trump highlighted his own achievements, asserting America's resurgence. He anticipates stronger US-China relations despite tensions.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पXi Jinpingशी जिनपिंगAmericaअमेरिकाchinaचीन