शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

यंदाचा अर्थसंकल्प ‘गेम चेंजर’

By admin | Updated: March 9, 2015 01:59 IST

लोकसभा निवडणुकीला अद्याप बराच वेळ असल्यामुळे बहुमतात असलेल्या भाजपा शासना

अर्थतज्ज्ञांचा निष्कर्ष : जगाचा गमावलेला विश्वास परतणारनागपूर : लोकसभा निवडणुकीला अद्याप बराच वेळ असल्यामुळे बहुमतात असलेल्या भाजपा शासनाचे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करताना वन डे किंवा टष्ट्वेंटी-२० पद्धतीला दूर ठेवून टेस्ट क्रिकेटप्रमाणे खेळ केला आहे. अर्थसंकल्पात दूरदृष्टी ठेवून तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यावर काटेकोर अंमलबजावणी झाल्यास हा अर्थसंकल्प देशासाठी ‘गेम चेंजर’ ठरू शकतो. या अर्थसंकल्पाने जगाचा गमावलेला विश्वास परत आणला, असा निष्कर्ष अर्थतज्ज्ञांनी नोंदविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजय पाटील व सीए जुल्फेश शाह यांच्या संयुक्त विद्यमाने शंकरनगर चौकातील साई सभागृह येथे रविवारी ‘अर्थसंकल्प-२०१५’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ सीए डॉ. टी.एस. रावल (नागपूर) व सीए यज्ञेश देसाई (मुंबई) हे मुख्य वक्ते होते. त्यांनी अर्थसंकल्पाची प्रशंसा करतानाच अनेक कमकुवत दुव्यांवरही प्रकाश टाकला.रावल म्हणाले, ७१ टक्के जनता शेतीवर अवलंबून असली तरी देशाच्या एकूण उत्पन्नात शेतीचा वाटा केवळ ११.५ टक्के आहे. शेतीचा विकास दर ३ टक्के एवढा कमी आहे. हा विकासदर ४ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आजही जुन्याच तंत्रज्ञानाद्वारे शेती केली जात असल्यामुळे विकास खुंटला आहे. या क्षेत्राकडे अधिक लक्ष देण्याची गरज होती, पण शासनाने विशेष काही केले नाही. येत्या वर्षभरात शेतीच्या विकासाकरिता ८.५ लाख कोटी रुपये भांडवल उभे करण्यात येणार आहे. बँकांनी पुढे आल्यास हे कठीण लक्ष्य पूर्ण करण्यात यश मिळू शकते. कोणीही दावा न केलेले ‘पीपीएफ’मधील तीन हजार व ‘ईपीएफ’मधील सहा हजार कोटी रुपये काढून सामाजिक कार्यासाठी वापरण्याची शासनाची योजना आहे. देशात २० हजार टन सोने निरुपयोगी पडून आहे. हे सोने बाहेर काढण्यासाठी सोन्याच्या ठेवीवर व्याज देण्याची योजना आहे. कौशल्य विकासावर जास्त भर नाही. काळ्या पैशासाठी कठोर तरतुदी केल्या आहेत, असे रावल यांनी सांगितले.स्थावर मालमत्ता खरेदी करताना २० हजारापेक्षा जास्त रोख रक्कम दिल्यास पेनाल्टी भरावी लागेल, असे देसाई यांनी सांगितले. एक कोटी रुपयापेक्षा जास्त उत्पन्नावर अधिभार वाढविण्यात आला आहे. सहकारी बँकेतील ‘आरडी’वर टीडीएस कापण्यात येणार आहे. ‘अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड’ कररहित करण्यात आले आहेत, अशी माहिती देसाई यांनी दिली. (प्रतिनिधी)