शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
5
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
6
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
7
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
8
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
9
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
10
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
11
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
12
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
13
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
14
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
15
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
16
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
17
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
18
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
19
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
20
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गिट्टीखदानमधील कुंटणखान्यावर धाड

By admin | Updated: June 13, 2015 02:56 IST

गिट्टीखदानमधील कुंटणखान्यावर धाड घालून गुन्हेशाखेच्या पथकाने एका महिलेला अटक केली.

स्वत:च्या मुलीकडून वेश्याव्यवसाय : गुन्हेशाखेची कारवाई नागपूर : गिट्टीखदानमधील कुंटणखान्यावर धाड घालून गुन्हेशाखेच्या पथकाने एका महिलेला अटक केली. अनिता योगीराज टेंभुर्णे (वय ३९, रा. कृष्ण नगर, आयबीएम रोड, नागपूर ) असे तिचे नाव आहे. आई आपल्या मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपते. मात्र, अनिताने आपल्या सख्ख्या मुलीलाच वेश्याव्यवसायाच्या दलदलीत ढकलल्याचे उघड झाले.अनिता गेल्या अनेक दिवसांपासून कुंटणखाना चालवते. तिच्याकडे ग्राहकांची भली मोठी यादी आहे. एका ग्राहकाकडून दुसऱ्या ग्राहकाचा संबंध जोडत तिने आपले नेटवर्क व्यापक केले आहे. पैशासाठी हपापलेल्या अनिताने बाहेरच्या महिला, मुलींसोबत स्वत:च्या पोटच्या मुलीलाही वेश्याव्यवसायात ढकलले आहे. ही माहिती कळाल्यावर गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून अनितासोबत संपर्क साधला. पैशाच्या बदल्यात तिने देहविक्रय करणारी तरुणी उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली. आज दुपारी ठरल्याप्रमाणे बनावट ग्राहकाने अनिताच्या हातात पैसे ठेवले. अनिताने त्याला एक तरुणी दिली. रुममध्ये जाताच ग्राहकाने पोलिसांना संकेत दिले. त्यानुसार पोलिसांनी अनिताच्या कुंटणखान्यावर धाड घातली. अनिता आणि वेश्याव्यवसाय करणाऱ्या ‘त्या‘ तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिची माहिती काढली असता पोलीसही चक्रावले. ती अनिताची मुलगी असल्याचे आणि पैशासाठी तिची आईच तिच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी अनिताला अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ च्या कलम ३,४,५,७ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली.