शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलन करून चित्रपट बंद पाडणे चुकीचे

By admin | Updated: December 21, 2015 03:17 IST

एखाद्या चित्रपटावर वाद निर्माण करून तो बंद पाडणे चुकीचे आहे. छोट्याशा बाबीला किती महत्त्व द्यायचे, हे आपण ठरविले पाहिजे.

पार्श्वगायक सुरेश वाडकर : आजचे संगीत डान्स अ‍ॅटमनागपूर : एखाद्या चित्रपटावर वाद निर्माण करून तो बंद पाडणे चुकीचे आहे. छोट्याशा बाबीला किती महत्त्व द्यायचे, हे आपण ठरविले पाहिजे. चित्रपटात एखादी बाब चुकीची असेल तर ती संबंधितांना पटवून द्यायला हवी, त्याबाबत चर्चा करायला हवी. चित्रपट बंद पाडणे ही लोकशाही नाही, असे मत सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांनी व्यक्त केले. संगीतकार दत्ता हरकरे यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘स्वर अमृताचे’ या सीडीचे लोकार्पण करण्यासाठी वाडकर नागपुरात आले होते. याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाबाबत वाद सुरू असला तरी त्याने चित्रपटाचे महत्त्व कमी होत नाही. सेन्सॉर बोर्डाने त्याला परवानगी दिली आहे. पण हल्ली वाद निर्माण करण्याचाच पायंडा पडला आहे. संवाद एकूणच समाजात कमी झाला आहे. रिअ‍ॅलिटी शोमधून समोर येणाऱ्या गायकांची तयारीच नसते. पण अशा शोमधून अमाप प्रसिद्धी चुकीच्या गायकांना मिळते आणि रियाज करून शिकलेल्या गायकावर मात्र अन्याय होतो. यामुळे रिअ‍ॅलिटी शोत जिंकलेल्या गायकाला पैसा देण्यापेक्षा चांगल्या गुरूकडे शिकण्यासाठी पाठवायला हवे. रिमिक्स हे शुद्ध संगीत नाही. त्यावर केवळ नाच करता येतो. उद्या एखाद्याच्या अंत्ययात्रेत लोक रिमिक्स लावून नाचतील की काय, अशी भीती वाटते. पुरस्कार वापसीबाबत आपण काहीही बोलणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी दत्ता हरकरे, कनका गडकरी, अनुजा केदार प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)नाशिक प्रकरणाबाबत बोलणे उचित नाहीनाशिकचे जमीन प्रकरण सध्या न्यायालयात आहे. त्यात माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले पण माझी बाजू मी मांडली आहे. शासनानेच त्याबाबत निर्णय घ्यावा. हे प्रकरण न्यायालयात असल्याने त्यावर बोलणे उचित नाही.