शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरला करणार ‘वर्ल्ड क्लास सिटी’

By admin | Updated: August 20, 2014 01:09 IST

राज्य शासनाच्या माध्यमातून मेट्रो, मिहान, अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ, रस्ते, उड्डाणपूल विविध प्रकल्पांच्या माध्यमातून नागपूर शहराचा झपाट्याने विकास होत आहे. येत्या काळात नागपूरला ‘वर्ल्ड क्लास सिटी’

पालकमंत्री नितीन राऊत यांचा मानस : मेट्रो रेल्वे, मिहानला गती नागपूर : राज्य शासनाच्या माध्यमातून मेट्रो, मिहान, अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ, रस्ते, उड्डाणपूल विविध प्रकल्पांच्या माध्यमातून नागपूर शहराचा झपाट्याने विकास होत आहे. येत्या काळात नागपूरला ‘वर्ल्ड क्लास सिटी’ करण्यावर भर दिला जाईल, असा मानस पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात पालकमंत्री राऊत यांनी नागपूर शहराच्या विकासाचे व्हिजन मांडले होते. त्याबद्दल लोकमतशी बोलताना राऊत म्हणाले, नागपुरात लवकरच मेट्रो रेल्वे धावणार आहे. या प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली. मंत्रिमंडळात पुणे मेट्रोचा विषय मंजूर होत असताना, आपण पुढाकार घेऊन नागपूर मेट्रोचा विषयही मंजूर करून घेतला. एवढेच नव्हे तर केंद्र सरकारकडे सुधारित आराखडा पाठविण्यासाठी आपण केलेल्या विनंतीवरून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बैठक घेतली. तीत मुख्यमंत्र्यांसह मुख्य सचिव, अप्पर मुख्य वित्त सचिव यांनी एकावेळी स्वाक्षरी केल्या. त्यामुळेच प्रस्ताव केंद्र सरकारकडे दिल्ली येथे पाठविता आला. आता केंद्रीय मंत्रिमंडळही त्या प्रस्तावाला मंजुरी देणार आहे. त्यामुळे नागपूरकरांना सक्षम, प्रभावी व स्वस्त अशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार आहे. हे काही एका दिवसांत झालेले नाही. त्यासाठी गेल्या वर्षभराचे परिश्रम लागले आहे, असेही त्यांनी सांगितले. महामार्गाच्या विकासामध्येही राज्य सरकारची महत्त्वाची भूमिका आहे. भंडारा रोड, चंद्रपूर रोड आणि छिंदवाडा रोड या महामार्गाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. भारत सरकारच्या भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग विकास विभागातर्फे २३ जुलै २०१४ च्या पत्रान्वये कामठी रोडवरील एलआयसी चौक ते कडबी चौक आणि आॅटोमोटिव्ह चौक ते टेकानाका हे दोन उड्डाणपूल बांधण्यात येणार असून, त्यासाठी १७५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याचे पालकमंत्री राऊत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)