नागपुरात हेरॉईनची तस्करी करणारी महिला गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 23:35 IST2019-04-18T23:34:33+5:302019-04-18T23:35:47+5:30

गुन्हे शाखेच्या पथकाने शांतिनगरात हेरॉईनची तस्करी करणाऱ्या एका महिलेला पकडून तिच्याजवळून २० ग्रॅम हेरॉईन जप्त केले.

Woman arrested for smuggling heroin in Nagpur | नागपुरात हेरॉईनची तस्करी करणारी महिला गजाआड

नागपुरात हेरॉईनची तस्करी करणारी महिला गजाआड

ठळक मुद्देगुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखेच्या पथकाने शांतिनगरात हेरॉईनची तस्करी करणाऱ्या एका महिलेला पकडून तिच्याजवळून २० ग्रॅम हेरॉईन जप्त केले. चंदाबाई प्रदीपसिंग ठाकूर (वय ५६) असे तिचे नाव आहे. गुरुवारी दुपारी इतवारी रेल्वे स्थानकाजवळ गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) ही कामगिरी बजावली.
चंदाबाई गेल्या अनेक दिवसांपासून अमली पदार्थाच्या तस्करीत सहभागी आहे. गुरुवारी दुपारी ती हेरॉईनची खेप घेऊन येणार असल्याची माहिती कळाल्याने, एनडीपीएसने कारवाईचा सापळा लावला. दुपारी १. १० वाजता ती शांतिनगरातील एका होमिओपॅथी हॉस्पिटलजवळ पोलिसांना आढळली. तिला ताब्यात घेऊन तिची झडती घेतली असता तिच्याकडे २० ग्रॅम हेरॉईन आढळले. या हेरॉईनची किंमत बाजारपेठेत ८० हजार रुपये आहे. पोलिसांनी ती हेरॉईन आणि ५०० रुपये जप्त केले. शांतिनगर पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली.

 

 

Web Title: Woman arrested for smuggling heroin in Nagpur