शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

अखेरचा सामना तरी जिंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:12 IST

आधीच्या पराभवातून धडा घेत यजमान संघाला कमी धावसंख्येवर रोखण्याची संधी होती, मात्र कोहलीने त्यादृष्टीने डावपेच आखले नाहीत. बुमराहकडून पहिली ...

आधीच्या पराभवातून धडा घेत यजमान संघाला कमी धावसंख्येवर रोखण्याची संधी होती, मात्र कोहलीने त्यादृष्टीने डावपेच आखले नाहीत. बुमराहकडून पहिली दोन षटक टाकून घेतल्यानंतर त्याने बदल केला. टी-२० त ठीक आहे पण वन डे मध्ये किमान चार षटके टाकू द्यायला हवीत. बुमराहला बदलल्याने ऑस्ट्रेलियाचे चांगलेच फावले. वॉर्नर आणि फिंच यांनी चांगलाच पाया मजबूत केला. सुरुवातीला भारतीय गोलंदाज अपयशी ठरल्यामुळे प्रतिस्पर्धी फलंदाजांनी मनसोक्त फटकेबाजी केली. दोन-तीन दिवसात दोन सामन्यात अखेरच्या दहा षटकात १०० वर धावा काढण्यात त्यांना यश आले. भुवनेश्वरचा अपवाद वगळता संपूर्ण ताकदीनिशी खेळणाऱ्या भारतीय गोलंदाजीसाठी हा चिंतेचा विषय ठरावा.

भारताचे वन डेतील यश भुवी आणि बुमराहचा वेगवान यशस्वी मारा तसेच मधल्या फळीत फिरकी गोलंदाजांच्या कमालीवर अवलंबून असते. बुमराहने डेथ ओव्हरमध्ये काही यॉर्कर चांगलेच टाकले. तथापि त्याचा मारा येथे यशस्वी होताना दिसत नाही. याशिवाय युजवेंद्र चहलदेखील मोठ्या धावा मोजत आहे. दुसऱ्या लढतीत हार्दिक पांड्याने काही षटके गोलंदाजी केली. तो सहज नव्हता पण शैलीत थोडा बदल करीत मारा करताना त्याला पाहता आले. पांड्याला सहकाऱ्यांची तोलामोलाची साथ न मिळाल्याने यजमानांना धावडोंगर उभारण्यास मुळीच अडसर आला नाही.

अशक्य आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाच्या धाडसाचे कौतुक करावे लागेल. विराट आणि राहुल फलंदाजी करीत असताना फटकेबाजीचा आनंद लुटता आला. मयंक आणि धवन यांनी फार काळ फलंदाजी केली नाही पण त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या माऱ्याला बऱ्यापैकी आव्हान दिले. त्यामुळे गोलंदाजांमध्ये धडकी भरली असावी.

ही मालिका गमावली, मात्र कॅनबेरा येथे आज बुधवारी भारताने सन्मान कायम राखण्यासाठी जिंकायलाच हवे. यामुळे टी-२० मालिकेला सामोरे जाताना आत्मविश्वास उंचावलेला असेल. विराटने नाणेफेक जिंकल्यास सामन्याचा निकाल बदलला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.(गेमप्लान)