शहरं
Join us  
Trending Stories
1
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
2
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
4
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
5
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
6
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
7
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
8
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
9
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
10
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
11
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
12
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
13
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
14
"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 
15
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
16
Payal Kapadia : नेत्रदीपक भरारी! पायल कपाडिया यांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड
17
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
18
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
19
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
20
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
Daily Top 2Weekly Top 5

यंदा सोयाबीन दर 'एमएसपी' एवढे तरी राहणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 14:40 IST

खाद्यतेलावरील आयात शुल्क कपात : पुढील हंगामात बसणार फटका

सुनील चरपे 
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
केंद्र सरकारने कच्च्या सोयाबीन, सूर्यफूल व पाम तेलावरील आयात शुल्क २० टक्क्यांवरून १० टक्के केला आहे. या तिन्ही तेलांची आयात वाढणार असून, ऑक्टोबरपासून पुढे सोयाबीनचे दर किमान आधारभूत किमती (एमएसपी) पेक्षा कमी राहण्याचा धोका आहे. परिणामी, सरकारच्या या निर्णयाचा देशातील सोयाबीन उत्पादकांना जबर फटका बसण्याची शक्यता आहे.


सरकारने २०२४ मध्ये कच्च्या खाद्यतेलावर २० टक्के, तर रिफाइंड खाद्यतेलावर २९.७५ टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लावला होता. उपकर विचारात घेता कच्च्या खाद्यतेलाच्या आयातीसाठी २७.५० टक्के, तर रिफाइंड तेलासाठी ३५.७५ टक्के शुल्क द्यावा लागायचा. देशात सोयाबीन पेरणीची धावपळ सुरू असताना केंद्र सरकारने ३० मे रोजी कच्च्या खाद्यतेलावरील आयात शुल्कमध्ये ५० टक्क्यांनी कपात केली आहे. रिफाइंड सोयाबीन, सूर्यफूल व पामतेलावरील आयात शुल्क कायम ठेवले आहे. कच्च्या खाद्यतेलाच्या आयातीला उपकरांसह १६.५० टक्के कर भरावा लागणार असल्याने आयात वाढणार आहे. हा निर्णय खाद्य तेल उत्पादकांच्या फायद्याचा ठरणार आहे. मान्सूनच्या पावसाने वर्दी दिल्याने शेतकऱ्यांची खरीप पेरणीसाठी लगीनघाई सुरू झाली आहे. मराठवाड्यात सोयाबीनचा पेरा आटोपण्यावर भर आहे.


ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये येणार परदेशातून तेल
यात सर्वाधिक कच्च्या सोयाबीन व पामतेलाची आयात केली जाणार आहे. देशातील आयातदारांनी सौदे सुरू केले असून, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये ते तेल देशात येईल. त्यानंतर शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात येणार असल्याने त्यावेळी दर ४,००० ते ४,३०० रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास राहण्याची शक्यता शेतमाल बाजार तज्ज्ञ विजय जावंधिया यांनी व्यक्त केली आहे.


पेरणीपूर्वीच ब्राझीलच्या बाजारात सौदे झाले सुरू

  • ब्राझीलमध्ये सोयाबीनची पेरणी सुरू व्हायची आहे. मात्र, तेथील शेतकऱ्यांनी वायदे बाजारात सन २०२६ साठी त्यांच्या सोयाबीनचे ११ डॉलर प्रतिबुशेल (एक बुशेल- २७.२२ किलो) दराने आताच सौदे केले आहेत.
  • त्यामुळे जागतिक बाजारात सोयाबीनचे दर ३,४५८ ते ३,५५० रुपये प्रतिक्विंटल असेल.
  • यावर्षीच्या खरीप हंगामासाठी केंद्र सरकारने सोयाबीनची एमएसपी ५,३२८ रुपये प्रतिक्विंटल जाहीर केली आहे.


लागवड २ लाख हेक्टरने कमी होणार
मागील वर्षीच्या कमी उत्पन्नामुळे यंदा सोयाबीनच्या लागवडीवर परिणाम होणार असून, लागवड २ लाख हेक्टरने कमी होणार असल्याची माहिती राज्य कृषी विभागाने दिली. परिणामी यंदा सोयाबीन घ्यावे की नाही, अशी द्विधा मनस्थिती शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, यंदा महाराष्ट्रात एकूण १४४.९७ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार आहे. यामध्ये धान्य, कडधान्य, तेलबिया आणि कापूस यांचा समावेश आहे

टॅग्स :Soybeanसोयाबीनnagpurनागपूर