यूपीमधून वैश्य समाजाचा मंत्री का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST2021-06-24T04:07:43+5:302021-06-24T04:07:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क लखनऊ : केंद्रीय मंत्रिमंडळात २५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशमधून वैश्य समाजाचा ...

Why is there no minister of Vaishya Samaj from UP? | यूपीमधून वैश्य समाजाचा मंत्री का नाही?

यूपीमधून वैश्य समाजाचा मंत्री का नाही?

लोकमत न्यूज नेटवर्क

लखनऊ : केंद्रीय मंत्रिमंडळात २५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशमधून वैश्य समाजाचा एकाही व्यक्तिला प्रतिनिधित्त्व देण्यात आले नसल्याने या समाजाच्या युवा वर्गात नाराजी दिसून येत आहे.

युवा वर्गाच्या तर्कानुसार, युपीमध्ये वैश्य मतदारांच्या तुलनेत मागास वर्गातील काही जातींच्या मतदारांची संख्या बरीच कमी आहे. तरीदेखील त्या समाजांना वैश्यांच्या तुलनेत युपी सरकारपासून ते केंद्र सरकारमध्ये जास्त प्राधान्य दिल्या जात आहे. विशेषत: वैश्य समाजाचे मत भाजपाला मोठ्या प्रमाणात मिळत असतानाही, ही स्थिती आहे. त्यामुळे, मंत्रिमंडळात समुदायाचा एकही प्रतिनिधी नसल्याने युवा वर्ग निराश झाला आहे. यूपीएच्या कार्यकाळात या समुदायातून श्रीप्रकाश जायसवाल व डॉ. अखिलेश दासगुप्ता या दोन नेत्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. उत्तर प्रदेशमधून ८० लोकसभेच्या जागा असोत किंवा विधानसभेच्या ४०३ जागा असोत. वैश्य समाजाच्या उमेदवारांना बऱ्याच कमी जागा दिल्या जातात. राजकीय विश्लेषकांच्या मते या असल्या उपेक्षेने नाराज होऊन वैश्य समाजाचे मतदार दिल्लीप्रमाणेच यूपीमध्येही दुसऱ्या दलाची वाट धरण्याची शक्यता आहे.

................

Web Title: Why is there no minister of Vaishya Samaj from UP?