शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

व्यवहारेंवर गुन्हा दाखल का नाही?

By admin | Updated: November 21, 2015 03:06 IST

मेडिकलच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे यांच्या छळाला कंटाळून पदव्युत्तर विद्यार्थ्याने केलेला आत्महत्येचा प्रयत्न, ...

विद्यार्थ्यांच्या तक्रारी पोलिसांकडे सुपूर्द : अधिष्ठात्यांनी बजावली कारणे दाखवा नोटीसनागपूर : मेडिकलच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे यांच्या छळाला कंटाळून पदव्युत्तर विद्यार्थ्याने केलेला आत्महत्येचा प्रयत्न, एका विद्यार्थिनीने त्यांच्याविरोधात केलेल्या लैंगिक छळाची तक्रार व पदवीपूर्व विद्यार्थ्यांच्या तक्रारी मेडिकल प्रशासनाने शुक्रवारी अजनी पोलीस ठाण्याकडे पाठविल्या, असे असतानाही रात्री उशिरापर्यंत व्यवहारेंवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. डॉ. व्यवहारेविरुद्ध पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करून मेडिकलच्या चौकशी समितीच्या अहवालावरून गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. डॉ. व्यवहारे यांच्या जाचाला कंटाळून त्यांच्याच विभागातील पदव्युत्तर विद्यार्थी डॉ. नितीन शरणागतने मंगळवारी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे बयान दिले. आत्महत्येच्या प्रयत्नापूर्वी डॉ. शरणागत यांनी लिहिलेल्या पत्रात डॉ. व्यवहारे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप लावले आहे. पत्रात, या विद्यार्थ्यांने डॉ. व्यवहारे हे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नातेवाईक आहेत. मंत्र्याच्या नावाने ते वारंवार धमकावत असून जीवे मारण्यासह भविष्य खराब करून देण्याची धमकी देत असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांचेच अधिष्ठात्यांना पत्रनागपूर : डॉ. शरणागत यांनी पोलिसांना दिलेल्या बयानात डॉ. व्यवहारे देत असलेल्या मानसिक त्रासामुळेच आत्महत्या करण्याच्या उद्देशाने झोपेच्या १८ गोळ्या सेवन केल्याचे म्हटले आहे. असे असतानाही डॉ. व्यवहारेंच्या विरुद्ध एन.सी.क्र.२२७१/१५ कलम ५०४, ५०६ नोंद करण्यात आली आहे. अजनी पोलिसांनी शुक्रवारी अधिष्ठात्यांना दिलेल्या पत्रात डॉ. व्यवहारे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे असून ते मेडिकलच्या प्रशासकीय बाबीशी निगडीत आहेत. तरी याबाबत सखोल चौकशी करून त्यातून जर फौजदारी गुन्हा निष्पन्न झाल्यास तर याबाबत पोलीस ठाण्यास कळवावे असे म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारीला घेऊन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी बुधवारी तातडीची कॉलेज कौन्सिल बोलवित डॉ. व्यवहारेंना उपअधिष्ठाता पदावर काढून टाकले. २४ तासांच्या आत अभिप्रायही मागितला. परंतु डॉ. व्यवहारे यांनी, माझे चारित्र्य मलीन करण्याचा हा प्रयत्न आहे, असा एका ओळीचा अभिप्राय दिल्याने शुक्रवारी डॉ. व्यवहारेंना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या शिवाय तीन सदस्यीय समिती स्थापन करून २४ तासांच्या आत अहवाल सादर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. या समितीत शरीररचनाशास्त्र विभागाचे डॉ. फूल पाटील, पीएसएम विभागाचे डॉ. प्रकाश भातकुले तर पॅथालॉजी विभागाचे डॉ. राऊत यांचा सहभाग आहे. त्यांच्या कार्यात अडथळा येऊ नये यासाठी अधिष्ठात्यांनी एक वेगळी खोली आणि क्लार्क मदतीसाठी दिले आहेत.(प्रतिनिधी)शनिवारी ठरवू आंदोलनाची भूमिकाडॉ. व्यवहारेंवर कारवाई करण्यासाठी ४८ तासांचा अल्टीमेटम शनिवारी दुपारी ४ वाजता संपणार आहे. त्यापूर्वी पर्यंत डॉ. व्यवहारेंवर कारवाई न झाल्यास आंदोलनाची भूमिका ठरवू, अशी प्रतिक्रिया सेंट्रल मार्डचे सचिव डॉ. आयुध मकदुम आणि स्टुडन्ट कौन्सिल मेडिकल कॉलेजचे स्टुडन्ट वेलफेअर अध्यक्ष मंगेश बन्सोड यांनी दिली.