शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात आंबेकरच्या बंगल्यावर मनपाने आजवर कारवाई का केली नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 20:30 IST

कुख्यात गुंड संतोष आंबेकर याने तब्बल ८८१.७१ चौरस मीटर क्षेत्रात अनधिकृत बांधकाम करून सात वर्षापूर्वी आलिशान बंगला उभारला. असे असतानाही महापालिकेने या बंगल्यावर आजवर कारवाई केली नाही.

ठळक मुद्देमंजुरी २१.३० ची : बांधकाम ९०३.०१ चौरस मीटर क्षेत्रात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुख्यात गुंड संतोष आंबेकर याने नागपुरातील हमालपुरा भागातील अवधूत रोड येथे तीन प्लॉट एकत्र करून ९०३.०१ चौरस मीटर जागेत अनधिकृत बंगला उभारला होता. सुरुवातीला १९९९ मध्ये आंबेकर याने २१.३० चौरस मीटर बांधकामाची मंजुरी घेतली होती. परंतु प्रत्यक्षात ९०३.०१ चौरस मीटर जागेत बांधकाम केले. म्हणजेच तब्बल ८८१.७१ चौरस मीटर क्षेत्रात अनधिकृत बांधकाम करून सात वर्षापूर्वी आलिशान बंगला उभारला. असे असतानाही महापालिकेने या बंगल्यावर आजवर कारवाई केली नाही. तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अतिक्रमण व अवैध बांधकामाविरोधात धडक कारवाई सुरू केल्याने आंबेकरच्या आलिशान बंगल्यावर बुधवारी कारवाईला सुरुवात झाली.

वास्तविक या बंगल्याचा परिसर पाच भूखंडांवर आहे. त्यातील दोन भूखंडांवर जिम व लॉन आहे. उर्वरित तीन भूखंडांवर हा संपूर्ण बंगला उभारण्यात आला. बंगल्यावर १५ ते १६ कोटींचा खर्च आला आहे. काही वर्ष बांधकाम सुरूअसूनही महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले. वेळीच कारवाई झाली असती तर हा बंगला उभा राहिला नसता.आंबेकरच्या धास्तीमुळे या बंगल्यावर मनपाने कारवाई केली नाही. बंगला अनधिकृत असतानाही यासंदर्भातील फाईल झोनमध्ये पडून होती. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केल्यानंतर या अनधिकृत बांधकामाची माहिती तपासात पुढे आली. पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर बंगला पाडण्याला तातडीने सुरुवात करण्यात आली. मुंढे यांच्यामुळेच मनपा अधिकाऱ्यांना कारवाई करावी लागली.चार महिन्यांपूर्वी याच बंगल्याशेजारी असलेल्या चार माळ्याच्या इमारतींवर कारवाई करण्यात आली. मात्र, आंबेकरच्या बंगल्यावर कारवाई होत नव्हती. पुढील दोन दिवसात हा बंगला जमिनदोस्त होईल, असा दावा करण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी पुन्हा तोडकामाला सुरुवात करण्यात आली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाEnchroachmentअतिक्रमण