शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

मतदारवाढीचा फायदा कुणाला मिळणार?

By admin | Updated: February 17, 2017 02:48 IST

नागपूर महानगरपालिका निवडणुकांना अवघे काही दिवस राहिले असताना राजकीय पक्षांमधील आकडेतज्ज्ञ अपेक्षित जागांचे गणित जुळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मतदानदेखील वाढण्याची शक्यता : अपक्षांच्या मतांवर राजकीय समीकरण अवलंबून राहणार नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणुकांना अवघे काही दिवस राहिले असताना राजकीय पक्षांमधील आकडेतज्ज्ञ अपेक्षित जागांचे गणित जुळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या वेळच्या तुलनेत यंदा वाढलेल्या मतदारांची संख्या आणि देशभरात वाढणारी मतदानाची टक्केवारी लक्षात घेता, चमत्कार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच विविध पक्षांतील बंडखोरांनी अपक्ष म्हणून आव्हान उभे केल्यामुळे त्यांना जाणाऱ्या मतांवर राजकीय समीकरणे अवलंबून राहणार आहेत. मतदारवाढीचा फायदा नेमका कुठल्या पक्षाला मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.२०१२ साली नागपूर शहरातील मतदारांची संख्या १९ लाख ८६ हजार ५७ इतकी होती. यंदा ही संख्या २० लाख ९३ हजार ३९३ इतकी झाली आहे. २०१२ च्या तुलनेत यंदा मतदारांच्या संख्येत १ लाख ७ हजार ३३६ इतकी वाढ झाली आहे. जर प्रभागनिहाय रचना लक्षात घेतली, तर प्रत्येक प्रभागात सरासरी २ हजार ८२४ व प्रत्येक जागेमागे सुमारे ७१० मतदार वाढले आहेत. ही संख्या निश्चितच मोठी असून अटीतटीच्या लढती होणाऱ्या ठिकाणी तर हे नवमतदार मौलिक भूमिका पार पाडणार आहेत.दुसरीकडे गेल्या काही काळापासून देशभरातील विविध निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी सातत्याने वाढते आहे. निवडणूक आयोगाने केलेले प्रयत्न व राजकीय पक्षांचा पुढाकार यामुळे नागपुरातदेखील मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. मागील वेळेस नागपूर मनपा निवडणुकांत ५२ टक्के मतदान झाले होते. यंदा हेच प्रमाण ८ ते १५ टक्क्यांनी जरी वाढले तरी मोठा उलटफेर होण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही.मागील निवडणुकांत भाजपा व कॉंग्रेस यांच्यातील मतांच्या टक्केवारीचा फरक हा अवघा ४.६२ टक्के इतका होता. त्यामुळे मतदान आणि मतदार वाढीचा फायदा नेमका कुणाला मिळणार, याबाबत विविध कयास लावण्यात येत आहेत.अपक्षांच्या जागा वाढणार की घटणार ?नवीन प्रभागपद्धतीमुळे फारसे अपक्ष निवडणुकांच्या रिंगणात उभे राहणारच नाही, अशी मोठ्या राजकीय पक्षांची धारणा होती. मात्र काँग्रेस, भाजपामध्ये तिकीटवाटपानंतर मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली व पक्षातील कार्यकर्त्यांनीच अपक्ष म्हणून आव्हान उभे केले. यंदा थोडेथोडके नव्हे तर ३०२ अपक्ष उमेदवार निवडणुकांच्या रिंगणात आहेत. मागील निवडणुकांत १० अपक्षांनी विजय मिळविला होता व अपक्षांना झालेल्या एकूण मतदानाची संख्या १७.६९ टक्के इतकी होती. यंदा अपक्षांच्या जागा वाढणार की घटणार याबाबत विविध मतप्रवाह असले तरी मतांच्या टक्केवारीमध्ये घट झाली, तर निकालांत चमत्कार दिसून येऊ शकतात.