शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

सैनिक शहीद होतात तेव्हा मेणबत्तीवाले कुठे जातात ?

By admin | Updated: August 25, 2016 02:31 IST

मेणबत्ती पेटवून आंदोलन करणारे लोक प्रत्यक्षात विधायक असे कुठलेच काम करत नाहीत.

केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांचा सवाल :नदी प्रदूषित करणाऱ्या उद्योगसमूहांवर कठोर कारवाईचे संकेतनागपूर : मेणबत्ती पेटवून आंदोलन करणारे लोक प्रत्यक्षात विधायक असे कुठलेच काम करत नाहीत. ज्यावेळी एखादा दहशतवादी मारला जातो तेव्हा हे लगेच मेणबत्ती घेऊन विरोध करायला समोर येतात. परंतु देशाचे रक्षण करताना सैनिक शहीद होतात, त्यावेळी हे मेणबत्तीवाले कुठे जातात, असा सवाल केंद्रीय पर्यावरण, वने राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) अनिल दवे यांनी केला. नागपुरातील टिळक पत्रकार भवनात आयोजित ‘मीट द प्रेस’ कार्यक्रमात ते बोलत होते.श्री श्री रविशंकर यांनी नवी दिल्लीत यमुना नदीच्या तटावर आयोजित केलेल्या जागतिक सांस्कृतिक महोत्सवामुळे नदीप्रदूषण झाले होते. यावर कारवाई काय झाली याबाबत दवे यांना विचारणा झाली होती. न झालेले प्रदूषण मेणबत्तीवाल्यांना दिसते. परंतु मॅडोना व जॅक्सन संस्कृतीमुळे होणारे सांस्कृतिक प्रदूषण दिसत नाही. मेणबत्तीवाल्यांचे विचार हे देशाची समस्याच आहे, असे विधान दवे यांनी केले. प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराबाबतदेखील मोठ्या प्रमाणात ओरड होते. परंतु प्राण्यांमुळे अनेकदा गरीब मनुष्याकडे वित्त व जीवित हानी होते. प्राण्यांबाबत संवेदना असलीच पाहिजे. त्यांच्या कल्याणाचा विचार झालाच पाहिजे. परंतु अगोदर जिवंत व्यक्तीच्या कल्याणाला प्राधान्य दिले पाहिजे, असे प्रतिपादनदेखील त्यांनी केले. एखादे जनावर गायब झाले तर ओरडा करण्यापेक्षा तो कसा सापडेल यासंदर्भात पावले उचलायला हवीत, असेदेखील ते म्हणाले.(प्रतिनिधी)पावसाळ््यानंतर ‘जय’चा शोधजय वाघ नेमका कुठे गायब झाला आहे, याबाबतीत आत्ताच काही सांगणे कठीण होईल. परंतु सध्या पावसाळा सुरू आहे व वाघांच्या वर्तणुकीला समजून घेणे आवश्यक आहे. पावसाळा संपल्यानंतर त्याला शोधण्यासाठी ठोस मोहीम हाती घ्यावी लागेल, असे अनिल दवे म्हणाले. प्रदूषणासाठी दंड ही पद्धतच अयोग्यआपल्या देशात नदी प्रदूषणाची समस्या आहेच. परंतु नदी प्रदूषित केली म्हणून उद्योगसमूहांना दंड करणे ही पद्धतच चुकीचे आहे. अगोदर चूक करायची आणि मग पैसे देऊन ती दूर थोडीच होणार आहे. नदी प्रदूषण करणाऱ्यांना कठोर दंड व्हायलाच हवा. प्रदूषण करणारे कोणतेही उद्योगसमूह असो, त्यांच्यावर कडक कारवाई कशी होईल, याबाबत आराखडा तयार होत आहे, अशी माहिती अनिल दवे यांनी दिली.वाघांच्या शिकारीवर नियंत्रणासाठी इंटरपोलची मदतजगातील ७० टक्के वाघ देशातच आहेत. वाघांचे कातडे आणि इतर अवयवांना आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी आहे. शिकारीवर नियंत्रण यावे यासाठी केंद्र शासन पूर्ण ताकदीने योजना तयार करणार आहे. यासाठी इंटरपोलचीदेखील मदत घेण्यात येईल. सोबतच शेजारी राष्ट्रांकडूनदेखील सहकार्य घेण्यात येईल, असे प्रतिपादन अनिल दवे यांनी केले.