शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

विमानाचे अपहरण होते तेंव्हा...

By admin | Updated: November 21, 2015 03:23 IST

डॉ बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी अचानक उदयपूरहून कोलकाताला जाणाऱ्या विमानाच्या इमरजन्सी लॅन्डिगचा संदेश मिळाला.

विमानतळावर ‘मॉकड्रील’च्या माध्यमातून सुरक्षा यंत्रणेची चाचपणीनागपूर : डॉ बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी अचानक उदयपूरहून कोलकाताला जाणाऱ्या विमानाच्या इमरजन्सी लॅन्डिगचा संदेश मिळाला. थोड्याच वेळात या विमानाचे अपहरण झाल्याची माहिती धडकल्याने विमानतळावर एकच खळबळ उडाली. दहशतवाद्यांनी अल्फा ब्रावो २४७ या विमानाचे अपहरण करून काही प्रवाशांना बंधक बनविले होते. माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. हे विमान विमानतळावर सुरक्षित स्थळी उतरविण्यात आले, तशी क्यूआरटी, सीआयएसएफ व स्थानिक पोलीस जवानांची धावपळ सुरू झाली. विमानात पाच दहशतवादी एके-४७ रायफलसह असल्याचे समजले. त्यांनी विमानातील प्रवाशांना मारण्याची धमकी देत, येरवडा तुरुंगात असलेल्या दहशतवाद्याला सोडण्यासह १०० मिलियन अमेरिकन डॉलरची मागणी ठेवली होती. सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांना मागण्या पूर्ण करण्याचा बहाणा करीत बोलण्यात गुंतविले आणि या वेळात हल्ल्याची तयारी केली. पायलटकडून इशाऱ्याच्या भाषेत दहशतवाद्यांच्या हालचाली आणि ओळख पटविण्यात आली. त्यानंतर या दहशतवाद्यांना बोलणी करण्यासाठी खाली बोलविण्यात आले. ते खाली उतरताच त्यांच्यावर दणादण गोळ्या झाडण्यात आल्या. दहशतवाद्यांनीही पलटवार केला, मात्र अखेर पाचही दहशतवाद्यांना कंठस्नान घालून विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षित वाचविण्यात आले. तब्बल दोन ते अडीच तास रंगलेला हा अपहरनाट्याचा थरार विमानतळावरील प्रवाशांनी अनुभवला. हे अपहरण नाट्य खरेच आहे, असे वाटल्याने अनेकांची बोबडी वळली. मात्र हे मॉकड्रिल असल्याचे कळल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. मिहान इंडिया, एअरपोर्ट आॅथारिटी आॅफ इंडिया आणि स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने शहराचे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत करवडे यांच्या नियंत्रणात विमान अपहरणाचे हे प्रात्यक्षिक साकारण्यात आले. दहशतवाद्यांनी विमानाचे अपहरण केल्यास, अशा परिस्थितीला कसे तोंड द्यायचे, याचे प्रशिक्षणच या मॉकड्रिलच्या माध्यमातून जवानांना देण्यात आल्याचे श्रीकांत करवाडे यांनी यावेळी सांगितले. विमानाचे प्रत्यक्षात अपहरण झाल्यास प्रसंगावधानच वापरावे लागते, मात्र अशा परिस्थितीची जाणीव या माध्यमातून होत असल्याचे ते म्हणाले. सुरक्षा यंत्रणेच्या सजगतेची चाचपणी करण्यासाठी दरवर्षी मॉकड्रिल केली जात असल्याचे करवडे यांनी सांगितले. सध्या विमानतळाच्या बाहेर पोलीस व आतमध्ये सीआयएसएफच्या जवानांकडे सुरक्षेची जबाबदारी आहे. आमचे जवान प्रत्येक परिस्थितीशी तोंड देण्यास सज्ज असल्याचा विश्वास करवडे यांनी व्यक्त केला. गरज पडल्यास हैदराबाद किंवा दिल्लीहून दीड तासात एनएसजीचे कामांडोंना पाचारण केले जाऊ शकत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मिहानचे वरिष्ठ एअरपोर्ट संचालक अवधेश प्रसाद यांनी सुरक्षा आणि कोणतेही अत्याधुनिक वेपन तपासण्यासाठी सुसज्जित असल्याची माहिती दिली. सुरक्षा व्यवस्था आणखी कठोर केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विमानतळावर असलेल्या अत्याधुनिक डॉपलर रडारच्या साहाय्याने आकाशात होणाऱ्या संदिग्ध हालचालीवरही लक्ष ठेवल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी मुख्य आॅपरेशन अधिकारी ग्रुप कॅप्टन अजय चौरसिया, मिहानचे मुख्य सुरक्षा अधिकारी यशवंत सराटकर, विमानतळाचे संचालक रोशन कांबळे, वरिष्ठ आॅपरेशन मॅनेजर आर. लक्ष्मीनारायणन, सीआयएसएफचे संचालक गुरजित सिंह आदी अधिकारी उपस्थित होते. ३० जवानांच्या मदतीने हे मॉकड्रील राबविण्यात आले.(प्रतिनिधी)